१ अंक
मागील पोस्टमध्ये मी भाग्यांक म्हणजे काय आणि कुठल्या अंकावर कोणत्या ग्रहाचा अंमल असतो याबद्दल सांगितले. आता १ अंकाविषयी थोडे जाणून घेऊ. या अंकावर रवि ग्रहाचा अंमल असतो असे आपण मागेच पाहिले. रवि म्हणजेच सुर्यामुळे ही सारी सृष्टी कार्यरत आहे, पूर्णत: त्याच्यावर सर्वजण अवलंबून आहेत. याचा अभिमानच वाटत असणार रवीला, नाही का? आणि का नसावा? पण हे त्या ग्रहाविषयी ठिक. माणसं जेव्हा हा अभिमान बाळगून असतात तेव्हा कधी त्याचं रूपांतर हळूच अहंकारात होतं; हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. अर्थात हे माझं बोलणं सगळ्यांसाठी लागू नाही बरं का....!
पण एकूणच ज्यांचा भाग्यांक १ असतो (जन्मतारीख १,१०,१९,२८) त्यांना स्वतः विषयी नितांत अभिमान असतो. त्यातही ज्यांची जन्मतारीख १० असते ते याबाबत प्रथम क्रमांकावर असतात कारण शून्य ( ० ) हा अंक कधीही त्याच्या आधीच्या अंकाचे महत्व/ किंमत वाढवतो हे व्यवहारातले तत्व इथेही लागू पडते. १९ अंकामध्ये रवि आणि मंगळ या ग्रहांचे गुणधर्म असणार. म्हणजेच हे लोक जास्त अधिकारी वृत्तीचे दिसून येतील. म्हणजे मी या लोकांना dominating म्हणते आहे असा गैरसमज करून घेऊ नका. पण या लोकांमध्ये अधिकार वापरताना एक वेगळीच आक्रमकता येते. उत्तम output साठी लागणारे perfection यांच्यात उपजत आहे आणि कदाचित त्यामुळेच काही गोष्टी गृहीत धरूनच हे कामं करतात. (उदा. यांच्या डोळ्यासमोर जे ध्येय आहे ते इतरांनाही तितकेच सुस्पष्ट आहे असं यांना वाटतं आणि त्यानुसार यांचे आडाखे असतात. इतरांना यांचा आवाका झेपला नाही की हे upset होऊ शकतात.) २८ अंकावर सांगा बरं कोणत्या ग्रहांचा अंमल असेल? .... चंद्र आणि शनि. चंद्र म्हणजे आपलं मन, जे सतत वेगवेगळ्या गोष्टींकडे धावत असतं तर शनि म्हणजे अगदी तटस्थ, संयमी. म्हणजे चंद्राला जर आपण एखादा उथळ झरा म्हणलं तर शनि म्हणजे एक खोssल असा डोह म्हणावा लागेल. थोडक्यात ही जन्मतारीख असलेले लोक कधी इस पार तर कधी उस पार अशी वाटतील आपल्याला. काही जणांना ही सतत confused minded वाटतील तर काही लोकांना ही दरवेळी वेगळे रूप दाखवून चकित करणारे अवलिया वाटतील.
पण एकूणच या सर्व तारखांवर रविचे अधिपत्य आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे या सर्व लोकांची born leaders अशी व्याख्या करता येईल. प्रत्येकाला(या तारखांच्या लोकांना) हे साधता येईल का? याबाबत मात्र त्यांची जन्म पत्रिका अधिक सविस्तर पणे बोलू शकते. सध्या तरी आपले गुण-अवगुण यांचा अभ्यास करून आवश्यक वाटेल तिथे बदल करायला काय हरकत आहे?
So enjoy your leadership talent!
अंकशास्त्रावरून स्वतःला अजून ओळखायला वाचा आणि follow करा http://pradnyaastro.blogspot.com
हे article कसं वाटलं आवर्जून comment मधे लिहा.
So be in touch !

3 comments:
धन्यवाद सर! 🙏🏼🙏🏼
चांगली व सुसंगत अशी वाटणारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
धन्यवाद!
Post a Comment