Showing posts with label भाग्यांक. Show all posts
Showing posts with label भाग्यांक. Show all posts

Friday, March 22, 2019

भाग्यांक नऊ

भाग्यांक नऊ

भाग्यांक क्रमांक ९  हा मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. ज्योतिषीय दृष्ट्या मंगळ हा ग्रह शौर्य, बेधडक वृत्ती, तापट स्वभाव दर्शवतो. तो लढाऊ वृत्तीचा असला, तरी त्याच्याकडे गुरू सारखे नियोजन, शनि सारखी संयमी वृत्ती, रवीचा अधिकार नाही. त्यामुळे एक घाव दोन तुकडे, तडकाफडकी घेतलेले निर्णय आणि मग त्याचे भोगावे लागणारे परिणाम त्याचा ठपका या ग्रहावर आहे. पण तरीसुद्धा, जिगरबाज नेतृत्व, लढाऊ वृत्ती प्रचंड आत्मविश्वास हे गुणही हाच ग्रह दर्शवतो. यामुळेच नऊ हा भाग्यांक असलेले लोक ( ज्यांची जन्मतारीख ९, १८, २७ आहे)  स्वकर्तुत्वावर विश्वास असणारे, जे जे चॅलेंजिंग वाटेल ते करायला उत्सुक असणारे असतात. १८ तारीख म्हणजे रवि आणि शनि यांचे combination. ज्योतिषीय दृष्ट्या हे दोघे शत्रू ग्रह आहेत तर पौराणिक कथानुसार शनि हा रवीपुत्र आहे. रवि आत्माकारक, तेजस्वी, ग्रहमालेचा राजा म्हणून अधिकार व अहंकार बाळगणारा शनि संयम, चिकाटी पण विलंब आणि नैराश्य दाखवणारा असा आहे. यामुळे या तारखेचे लोक जेव्हा एखादे काम हाती घेतात तेव्हा त्याचे संपूर्ण नियोजन, योग्य आराखडा त्यांचा तयारच असणार. सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे होतात ना हेही ते सतत जोखत असतात, आणि मंगळाचे अधिपत्य असल्याने कामाची पूर्तता होईपर्यंत ते स्वस्थ रहात नाहीत. मूळ पत्रिकेतील हे तीन ग्रह कसे आहेत हेही महत्वाचे आहेच. जर दुर्दैवाने यातील कोणताही ग्रह कुयोगात असेल म्हणजेच स्वतःचे सकारात्मक परिणाम देण्यात कमी पडत असेल तर यांच्या या गुणांचे म्हणावे तसे कौतुक होत नाही आणि मग एक अस्वस्थता यांना ग्रासू लागते. पण एकूणच या तारखेचे लोक म्हणजे 'नाद करायचा नाय' असेच असतात. २७ तारिख म्हणजे चंद्र आणि नेपच्यून यांची जोडी. यांची कल्पना शक्ती अफाट असणार. चंद्र म्हणजे चंचलता, प्रेम आणि नेपच्यून म्हणजे भावविश्व. हे ज्या गोष्टी शब्दातीत असतात त्या अनुभवू शकतात. अव्यक्त अशा भावना, अवर्णनीय सौंदर्य वगैरे हे मानसिक स्तरावर अनुभवतात, पण म्हणून हे सारखेच कल्पनाविश्वात रममाण असतात असं नाही कारण ultimate effect हा मंगळाचा असतो. अनेक अनुभव घेऊनही हे लोक भानावर रहातात. यामुळेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं यांना सहज असतं. असं असलं तरी काही वेळा हे चुकीचं ठरू शकतं, पण तरी पत्रिकेतला मंगळ शुभयोगात असल्यास निदान यातून तयार होणारा आडमुठेपणा यांच्या स्वभावात असणार नाही आणि वागण्यात एक सादगी असेल हे नक्की.
या भाग्यांकाच्या लोकांमध्ये मुळातच स्वभावदोष कमी असतात असं म्हणायला हरकत नाही. आहेत ते गुण अधोरेखित करण्यासाठी भाग्यांक तक्त्याचा निश्चित उपयोग होईल. बाकी यांच्याकडे पाहून एकच गाणं आठवतं, ते म्हणजे ' हमसे है यह जमाना , दुनिया को है दिखाना .....!' so enjoy your energy with patience. 

Wednesday, January 23, 2019

भाग्यांक म्हणजे ....

भाग्यांक म्हणजे काय? 

भाग्यांक म्हणजे व्यक्तीच्याजन्मतारखेची एक अंकी बेरीज. या अंकात जन्म महिना व जन्मवर्ष यांचा विचार होत नाही. म्हणजेच व्यक्तीची जन्मतारीख जर १, १० किंवा १९,२८ यापैकी काहीही असली तरी त्यांचा भाग्यांक एक असेल तसेच ज्यांची जन्मतारीख ५,१४,२३ यापैकी असते त्यांचा भाग्यांक पाच असेल याप्रमाणे. जेव्हा पूर्ण जन्मतारखेची म्हणजेच जन्म तारीख, महीना व पूर्ण चार आकडी वर्ष यांची एक अंकी बेरीज जी येईल त्याला अंकशास्त्रात 'प्रारब्ध अंक' असे म्हणले जाते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमध्ये या दोन्ही अंकांचा खूप मोठा वाटा असतो. आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या  गोष्टी या अंकांच्या अंमलाखाली असल्याचे तुमच्या लक्षात येईल. उदा: तुमचा विवाह, नोकरीचा पहिला दिवस किंवा interview ची तारिख वगैरे. थोडा विचार करून बघा बरं ! असे १ ते ९ या अंकांचा विचार या शास्त्रात केला जातो. आपण पुढील पोस्टमध्ये प्रत्येक अंकाचा स्वतंत्र विचार करू.

मागील पोस्ट मध्ये मी भाग्यांक तक्त्याचा (bhagyank chart) उल्लेख केला आहे. प्रत्येक भाग्यांकाचा तक्ता वेगळा असतो. शास्त्राप्रमाणे सोने, चांदी अथवा तांब्याच्या पत्र्यावर असा तक्ता बनवून त्याचा ताईत करून तो जास्तीत जास्त वेळ आपल्या बरोबर राहिल्याने हे अंक निश्चितच आपल्यासाठी सकारात्मक परिणाम करणारे ठरू शकतात. अन्यथा साध्या कागदावर ठराविक पद्धतीने केलेला तक्ता देखील परिणाम कारक ठरू शकतो असे माझे मत आहे. प्रत्येकाने स्वानुभवाने निर्णय घेणे योग्य होईल.

अंकशास्त्रात प्रत्येक अंक हा एक ग्रह निर्देशित करतो. ते कोणते ते पाहू.
१ --- रवि, २ --- चंद्र, ३ --- गुरु, ४ --- हर्षल, ५ --- बुध, ६ --- शुक्र, ७ --- नेपच्यून, ८ --- शनि, ९ --- मंगळ
आपल्या भाग्यांकावर कोणत्या ग्रहाचा अंमल आहे हे तुम्ही आता ओळखू शकाल. प्रत्येक ग्रहांचे स्वरूप काय आहे हे वेध भविष्याचा येथे मी पोस्ट करेन तर या पुढच्या पोस्ट मधे प्रत्येक अंक काय दर्शवतो हे आपण पाहू.

तुम्हाला हा लेख कसा वाटला याबद्दल नक्की comment करा आणि या शास्त्राबद्दल आणखी जाणून घ्या www.pradnyaastro.blogspot.com वर !
तुमचे प्रश्न most welcome !!

Thursday, January 17, 2019

भाग्यांक आठ

आठ या क्रमांकावर शनि या ग्रहाचे अधिपत्य आहे. शनि म्हणलं की साडेसाती, त्रास एवढंच समीकरण आपण लावतो. ज्योतिष शास्त्रातसुद्धा शनि हा पापग्रह समजला जातो. शनि विलंब करणारा, तसेच कोणत्याही गोष्टीचे थोडे हातचे राखून फलित देणारा. यामुळे आठ भाग्यांक असणारे (ज्यांची जन्मतारीख ८, १७,२६ आहे.) थोडे निराशेकडे, आपल्याला अपेक्षित यश मिळणार नाही असा नकारात्मक विचार करणारे असे असू शकतात; पण यांच्याकडे असणारी चिकाटी, संयम या गोष्टी वाखाणण्याजोग्या असतात. शनि हा ग्रह भोगायला लावतो यापेक्षा तो भोग संपवतो असा विचार करण्याची सकारात्मकता आठ भाग्यांकचे लोकं अगदी लीलया बाळगतात. या विचारसरणीचा त्यांना व्यावहारिक फायदा नक्कीच होतो, पण काही वेळा इतर लोकांना मात्र हे सदोदीत शिक्षकाच्या भूमिकेत वावरतात असं वाटू शकतं. शनिचा अंमल असल्याने हे लोक धीरगंभीर चेहऱ्याचे, सतत गहन विचारात गढले असल्याचे वाटतात. शनिचा आकुंचन हा गुणधर्म देखील आहे. म्हणजे भीतीने चेहरा पांढरा फटक होतो असं जेव्हा आपण म्हणतो त्यामागे शनीचे कारकत्व असते. त्यामुळे हा भाग्यांक असलेल्या लोकांच्या पत्रिकेत शनीचे इतर ग्रहांशी काय योग होतात यावर यांना होणारे आजार अवलंबून असू शकतात. पण मुळातच रक्तातील लाल पेशी कमी होणे, कमी रक्तदाब यासारख्या आजारांपासून लांब रहाण्याची खबरदारी यांनी घ्यावी.
आता तारखेनुरूप विचार करू. १७ या तारखेमधे रवि आणि नेपच्यून या ग्रहांची जोडी आहे. रवी अधिकार तर नेपच्यून गुढत्व दर्शवतो. आपले अधिकार जरा खुबीने वापरण्यात यांचा हातखंडा असतो. पत्ते खेळताना हुकमी एक्का कुठे वापरावा याबद्दल यांचा आडाखा चुकणार नाही. याचा यांना स्वतःला फायदा किती होईल; हे पत्रिकेत शनी- रवी यांचा काय योग आहे त्यावर अवलंबून राहील. हे लोक दुसऱ्या लोकांसाठी मात्र निश्चित योग्य सल्लागार होऊ शकतील असं मात्र वाटतं; कारण शनिकडे संयम आहे. इतरांच्या बाबतीतही हे घाईने काही जुजबी उत्तर देऊन किंवा वेळ मारून नेण्यासाठी काहीतरी सांगून वाटेला लावतील असं होणार नाही. शनि हा ग्रह सेवा दर्शवतो. थोडक्यात यांची इच्छा असो अथवा नसो, हे इतरांच्या उपयोगी पडतातच आणि त्याचे योग्य ते returns मिळाले नाहीत तर शनि जे दु:ख दर्शवतो, ते यांना अनुभवावे लागते.
आता २६ तारखेचा विचार करू. येथे जोडी येते चंद्र आणि शुक्र यांची. चंद्र चंचलता तर शुक्र आनंद दर्शवतो आणि या दोघांवर संयम आणि दु:ख यांचे प्रतिनिधित्व करणारा शनिचा अंमल. कसे असेल २६ तारखेचे व्यक्तिमत्त्व ? गोंधळलेले? कुठे कसं वागावं याबाबत संभ्रमात असलेले ? मुळीच नाही. यांच्या चंचलतेला संयमाची किनार असते तर आनंदात एक प्रकारची धीरगंभीरता असते. प्रसंग कसाही असो हे आंतरीक शांती ढळु देणार नाहीत.
एकूणच भाग्यांक आठ असलेले थोडे गंभीर, नैराश्यवादी, स्थितप्रज्ञ, संयमी वृत्तीचे असतात असं म्हणू शकतो. त्यांच्यात या प्रत्येक गोष्टीची तीव्रता किती असेल ते मूळ पत्रिकेतील ग्राहयोगांवर अवलंबून असेल, पण तुर्तास आपल्या स्वभावातील नेमकी मेख ओळखून काय कमी- जास्त करावे याचा विचार करायला यांनी नक्कीच सुरुवात केली असेल. या बाबतीत तुमचा भाग्यांक तक्ता तुम्हाला नक्कीच फायद्याचा होऊ शकतो.
तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर comment करा, आणि नक्की follow करा http://pradnyaastro.blogspot.com.

Friday, January 4, 2019

भाग्यांक सात

सात हा क्रमांक अंकशास्त्रनुसार 'नेपच्यून' या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. ज्योतिषीय दृष्ट्या पत्रिकेत नेपच्यून ज्या भावात असतो तिथे एक प्रकारची गूढता किंवा गुप्तता दर्शवतो. त्यामुळे सात हा भाग्यांक असणारे (ज्यांची जन्म तारीख ७,१६,२५ आहे.) असेच गूढ व्यक्तिमत्त्व बाळगून असतात असं म्हणता येईल. नेपच्यून हा ग्रह जास्त करून भावना, जाणीवा यांमधून प्रतित होतो. प्रार्थना करताना जाणवणारा अंतरनाद, एखाद्या वाद्यातुन छेडली गेलेली सुरावट अशा अमूर्त, अव्यक्त जाणीवांवर या ग्रहाचा अंमल असतो. कदाचित यामुळेच सात भाग्यांक असलेले लोकं मोकळेपणाने व्यक्त होत नसावेत. सतत आत कुढत रहाण्याची सवय असते. दु:खी चेहऱ्यानेच वावरतील असे नाही, पण काहिनाकाही शल्य हे लोक बाळगुन असतात. जन्म तारखेमधे ७ हा अंक वारंवार येत असेल तरी ही शक्यता आहे. आता तारखेप्रमाणे विचार करू.
          १६ या तारखेमधे रवि आणि शुक्र ही जोडी दिसून येते. रवी म्हणजे अधिकार, अभिमान, अहंकार तर शुक्र म्हणजे आनंदी व्यक्तीमत्व, ज्याला कलेची आवड/जाण आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून अधिकार मिळाल्यास आनंदीत होणारे. या लोकांकडे निश्चित काही कला असू शकते. ती त्यांनी जोपासावी, खुलवावी. आणखी एक विचार, कि शुक्र हा अतिशय तेजस्वी ग्रह आहे. पहाटेच्या वेळी शुक्राची चांदणी अगदी लोभस आणि खुलून दिसते. रवीच्या सान्निध्यात त्याचे तेज अंशतः झाकोळते. सोळा जन्मतारीख असलेल्या लोकांना देखील असा अनुभव असेल की स्वतःच्या अधिकार व मानमरातब मिळवण्याच्या त्यांच्या ज्या जागा आहेत तिथे त्यांचे कलाप्रिय मन झाकोळून जाते. आणि त्यात अव्यक्त रहाणारा नेपच्यून काम करतो. यांचा भाग्यांक तक्ता कदाचित यांना नवनवीन संधी देऊन किंवा थोडा मोकळेपणाने वागण्याचा विचार देऊन त्या शुक्राला उल्हासित ठेवण्यात मदत करू शकेल. २५ जन्म तारीख म्हणजे चंद्र व बुध असं combination. ज्योतिषीय परिभाषेत बुध हा चंद्राला शत्रू मानतो. (त्याबद्दल एक आख्यायिका आहे, ज्यात मी आत्ता शिरत नाही.) चंद्र चंचलता आणि बुध द्वैत्व दर्शवतो. वरवर पाहता दोघांचे गुणधर्म सारखेच. पण त्यांचे शत्रुत्व असल्याने या लोकांचे स्वतःशीच सतत द्वंद्व चालू असते, परिणामी निर्णय घ्यायला वेळ लागतो, घेतलेल्या निर्णयाचे समाधान नसते आणि झालंच सगळं सुरळीत तरीसुद्धा एक विचित्र साशंकता यांना सतत घेरून रहाते. पण या व्यक्ती मृदू स्वभावाच्या आणि हुशार असतात. यांच्या या गुणांची व्यापकता वाढवून त्यांच्या स्वभाव दोषांवर मात करण्यास भाग्यांक तक्ता फायद्याचा ठरू शकतो.

एकूणच नेपच्यून हा ग्रह गूढ, गोपनीय, अदृश्य, अव्यक्त अशा गोष्टींचा कारक आहे. त्याच्या अंमलाखाली असलेल्या लोकांनी ध्यान, मानसपूजा, ओंकार साधना या अनुभूतींच्या शास्त्राचा अभ्यास वाढवून आपल्या जाणीवा आणखी दृढ कराव्यात, उपासना वाढवावी आणि स्वानंदाचा अनुभव घ्यावा. तुमचे अनुभव आणि या लेखाविषयीचे तुमचे मत नक्की व्यक्त करा आणि आणखी चर्चा करण्यासाठी follow करा, http://pradnyaastro.blogspot.com 

Saturday, December 22, 2018

भाग्यांक सहा.

भाग्यांक सहा.

सहा या अंकावर आनंदी, सर्व भौतिक सुखांवर राज्य करणाऱ्या, सुखासीन अशा शुक्र ग्रहाचा अंमल आहे. आपली सूर्यमाला पाहिली तर शुक्र हा अंतरवर्ती ग्रह आहे. अतिशय तेजस्वी असा हा ग्रह आहे. शुक्राची चांदणी पहाटेच्या वेळी खूपच मोहक दिसते. अशाच मोहक गोष्टींवर शुक्र राज्य करतो. थोडक्यात सांगायचे तर स्त्रिया, सुवासिक अत्तरे, शय्यासुख, वाहन सौख्य, पैसा हे सगळे काही शुक्र ग्रह दाखवतो. यामुळेच सहा भाग्यांक असलेले (ज्यांची जन्म तारीख ६, १५, २४ आहे) हे या भौतिक गोष्टींना महत्त्व देणारे, त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे असतात. शुक्र हा ग्रह व्यक्तीला सौन्दर्याची जाण देतो. यांच्यात कलात्मकता उपजतच असते. ती कलात्मकता प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारे दिसून येईल. कोणी कपडे निवडताना, कोणी घर सजवताना, कोणी दागिने वेगळ्या प्रकारचे निवडेल, तर कोणाला आणखी काही. पत्रिकेत शुक्र जेवढा बलवान, त्याचे इतर ग्रहांशी योग जेवढे उत्तम; तेवढा या कलात्मक गोष्टींमधे त्या व्यक्तीचा हातखंडा असतो. सहा जन्मतारीख असलेल्या व्यक्तीत या गोष्टी दिसतीलच, आता इतर तारखा पाहू. १५ तारीख म्हणजे रवि आणि बुध यांचे गुणधर्म सुद्धा त्या व्यक्तीत असतील. रवि म्हणजे अधिकार तर बुध म्हणजे बुद्धी. आपल्या बुद्धीच्या जोरावर अधिकार मिळाल्यावर आनंदी होणारे. पण बुध हा ग्रह थोडी अवखळ बुद्धी दाखवतो. मिळणारा अधिकार हा स्वतः जिंकण्याची जिद्द दाखवण्यापेक्षा दुसऱ्याला हरवण्याची उर्मी बाळगल्यामुळे मिळालेला असतो. अर्थात ही वृत्ती पत्रिकेत बुध बिघडला असेल तर अधिक असते. तो सुस्थितीत असेल तर कमी, पण मुळात असतेच. यामुळे या व्यक्ती चढाओढ, rat race, स्पर्धा यात अडकू शकतात. यात यांची मानसिकता जपायला भाग्यांक तक्ता नक्कीच उपयोगी पडेल. आता २४ तारीख असलेले लोक म्हणजे चंद्र आणि हर्षल अशी जोडी. विलक्षण बुद्धिमत्ता असलेले, पण मनानी विचार करणारे असे लोक. यांची मानसिक पातळी थोडी औरच असते. काही वेगळे अनुभव, विचार यांचा अविभाज्य भाग असतात. ते अशा गोष्टी इतरांना सांगू शकतील का नाही हे त्यांच्या स्वभावावर किंवा थोडक्यात पत्रिकेतील इतर ग्रहांवर अवलंबून असते; पण त्यांच्या जवळच्या या वैचारिक शिदोरीमुळे ते आनंदी असतात असं म्हणु शकतो.
तर एकूणच शुक्र हा ग्रह व्यावहारिक पातळीवर सुखात ठेवणारा आहे. तुमच्या पत्रिकेतील त्याचं स्थान आणि इतर ग्रहांशी होणारे शुभाशुभ योग यावर तुमची व्यक्त होण्याची पद्धत ठरते. तुमच्या दोषांवर मात करायला तसंच गुणांना आणखी खुलवायला ६ क्रमांकाचा भाग्यांक तक्ता निश्चित उपयोगी होतो. त्यापूर्वी आपली नेमकी 'निवड' ही अनेकांना आवडणारी असू शकते हे ध्यानात घेऊन नेहमीसारखे खूष रहा. तुमच्या comments मुळे मी पण खूष होईन! आवडलं तर नक्की subscribe करा http://pradnyaastro.blogspot.com

Friday, October 12, 2018

भाग्यांक पाच

भाग्यांक पाच

पाच हा क्रमांक आहे बुध या ग्रहाचा. सूर्यमालेतील सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि सर्वात लहान असा हा ग्रह. ज्योतिषीय विचार करताना बुध हा लहान मुले, अल्लड स्वभाव, बुद्धी, द्विधा मनस्थिती, खेळाचे मैदान, गणित या गोष्टी दर्शवतो. आता तुम्हाला वाटेल या अशा वेगवेगळ्या गोष्टींचा काय संबंध? तर या साऱ्या गोष्टी लहान मुलांशी निगडित आहेत. लहान मुलांकडे अचाट बुद्धीमत्ता असते. आपल्यापेक्षा त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो, पण निर्णय क्षमता मात्र कमी असल्याने द्विधा मनस्थिती असते. खेळायला आवडते म्हणून खेळाचे मैदान बुध दर्शवतो. गणित... मुलं खुप calculative असतात. इथे फक्त दोन अधिक दोन किती अशा गणिताचा विचार करून चालणार नाही. एकूणच व्यावहारिक फायदा-तोटा बुध आणि त्याच्या अमलाखाली असणाऱ्या व्यक्ती (ज्यांची जन्म तारीख ५, १४,२३ आहे) नीट समजून घेऊ शकतात. याचा अर्थ या व्यक्ती नेहमीच स्वतः चा फायदा बघतात असा नाही... ते मूळ पत्रिकेत त्यांचा बुध कसा आहे यावरून ठरेल, पण यांना या गोष्टी लक्षात येतात हे निश्चित.
आता प्रत्येक जन्म तारखेचा स्वतंत्र विचार करू. ५ ही जन्म तारीख असलेल्या लोकांमध्ये बुधाचे सर्व गुणधर्म ठळकपणे दिसून येतीलच. स्वभावाने अल्लड पण स्वतःचे नुकसान होऊ न देणारे. हे काही लोकांना अवखळ, उथळ स्वभावाचे वाटतील, विशेषतः ज्यांचा भाग्यांक ३ आहे त्यांना... पण हे पूर्णत: तसे नसतात. यांच्यात धरसोड वृत्ती असते हे मात्र नक्की. हुशार, व्यावहारिक असले तरी बेभरवशाचे वाटतात. १४ जन्म तारीख असलेले म्हणजे रवी आणि हर्षल यांचं अफलातून combination. या दोन्ही ग्रहांच्या गुणधर्मा विषयी माझ्या आधीच्या posts मधून अंदाज आला असेलच. थोडक्यात अधिकार आणि काही तरी वेगळेपण , स्वतःचा ठसा उमटवू पाहणारे हे लोक असतात. त्यासाठी माध्यम? त्यांची बुद्धी, शोधक वृत्ती, बोलण्याची शैली वगैरे. पण यांच्यात लहान मुलांना कशी स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची ओढ असते ती दिसून येते. यांच्यासमोर दुसऱ्या कोणाचे फार कौतुक झाले तर हे नाराज होतात. आणि ते स्वाभाविक आहे कारण यांच्यात कुवत असते हे नाकारून चालणार नाही. आता २३ तारखेचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की या लोकांमध्ये चंद्र आणि गुरु या ग्रहांचे गुण दोष असतात. चंद्र मनाने विचार करतो तर गुरू ज्ञानाच्या आधारे पुढे जातो. पण आधी २ हा क्रमांक म्हणजे आधी भावनेने विचार करतील, मग ज्ञानाची कास धरतील, आणि आहेत ते बुधाच्या अंमलाखाली. ज्या 'बुधाचा' अवखळपणा ज्या 'गुरूला' खुपतो, तो गुरू यांच्यातच आहे. म्हणून हे लोक स्वतःबद्दल जास्त judgemental असतात असं म्हणू या आपण. म्हणूनच हे इतरांपेक्षा स्वतःला लवकर सावरू शकतात. अर्थात पत्रिकेतील मूळ ग्रह एकमेकांशी काय योग करतात हे महत्त्वाचे आहेच.
थोडक्यात बुध ग्रहाची ही मंडळी व्यवहारकुशल, स्व -प्रतिमेविषयी सजग अशी असली तरी जबाबदारी घ्यायला थोडी बिचकणारी असतात. यांना खेळाची आवड असते, पण चिकाटी कमी असते. हुशार असले तरी ज्ञानी होण्याची तळमळ नसते. असो, हे गुणदोष लक्षात घेऊन स्वतःत बदल होण्यासाठी यांना भाग्यांक तक्त्याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. स्वतःचे अवगुण कळणे ही गुणी होण्याची पहिली पायरी आहे. ही पोस्ट वाचून पहिली पायरी चढायची इच्छा होते की नाही ते नक्की कळवा! जरूर comment करा आणि posts आवडल्यास follow करा. http://pradnyaastro.blogspot.com




Thursday, September 13, 2018

भाग्यांक चार



आज आपण भाग्यांक चार विषयी विचार करणार आहोत. या अंकावर 'हर्षल' या ग्रहाचे वर्चस्व आहे. या ग्रहाचा शोध १७८१ मध्ये अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ William Herschel यांनी लावला. हा ग्रह पृथ्वी पेक्षा ४ पट मोठा आहे आणि एक राशीचक्र पूर्ण करायला त्याला ८४ वर्ष लागतात म्हणून हा ग्रह प्रत्येक राशीत काय परिणाम करेल हा ज्योतिष शास्त्राचा एक अभ्यासाचा विषय आहे. पण साधारणतः या ग्रहाचे गुणधर्म मंगळ या ग्रहाशी जुळतात असे दिसून येते. मंगळापेक्षा हा थोडा extrimist आहे असंच म्हणावं लागेल. उदाहरण द्यायचे झालं तर असं म्हणू की घरात वापरली जाणारी विज (electricity) म्हणजे मंगळ असेल तर हर्षल एक power station आहे. थोडक्यात याच्याकडे जास्त शक्ती, उमेद आणि वेग आहे. एखादी गोष्ट समजून घेऊन आकलन करणे आणि तीच गोष्ट click होणे हा फरक इतर ग्रह आणि हर्षल यांच्यात आहे. हा ग्रह आधुनिकता, संशोधन तसंच विक्षिप्तपणा यांचा कारक आहे. अति हुशार व्यक्ती या कधी कधी whimsical वाटतात ना अगदी तसंच. तर ४ हा भाग्यांक असलेल्या व्यक्ती (ज्यांची जन्म तारीख ४,१३,२२ आणि ३१ आहे.) अशा हुशार, संशोधनप्रिय, काही तरी अनपेक्षित आणि 'ठासू'  करण्याच्या मनोवृत्तीच्या असतात. कोणत्याही गोष्टीतले काही वेगळेपण यांच्या लगेच लक्षात येते. मग ती कपड्यांची फॅशन असो किंवा इतर काही. राहणीमान आणि टापटीप यांच्याकडे उत्तम असते, त्याकरता हे फार पैसा उधळतील असं मात्र नाही. आपण कशामुळे चारचौघात उठून दिसू हे यांच्या लक्षात येतं आणि ते त्या गोष्टी 'सहजपणे' करतात इतकंच. थोडक्यात 'गुणग्राहकता' उत्तम असते. आता तारखेनुसार विचार करायचा झाला तर ४ तारीख असलेल्या सर्वामध्ये हे गुण असतातच , १३ तारीख म्हणजे रवी आणि गुरू यांची जोडी. स्वतःकडे अधिकार घेऊन दुसऱ्याला ज्ञान देणारे, तेसुद्धा पूर्ण हुशारीने, समोरच्याची कुवत ओळखून. यामुळे हे उत्तम सल्लागार, शिक्षक होऊ शकतात. २२ तारीख म्हणजे चंद्राचे गुणधर्म तेसुद्धा दोन वेळा. मनाने जास्त विचार करणारे, कणभर घेऊन मणभर देणारे, याचा अर्थ पुर्णतः अव्यावहारिक असतात असे नाही कारण मुख्य प्रभाव हर्षल या ग्रहाचा आहे. पण एकूणच यांच्या मनातून एखादी गोष्ट सहजासहजी जात नाही तसंच यांच्यात निरीक्षण शक्ती दांडगी असते. आणि ३१ तारीख म्हणजे पुन्हा गुरू आणि रवी. समोरच्याला खूप काही सांगायचे असते यांना अगदी हक्काने.... थोडक्यात यांची स्वतः जवळ जे आहे ते दुसऱ्याला देण्याची वृत्ती असते. यांच्यातला शिक्षक जागा असतो आणि तो हर्षलच्या प्रभावाखाली असल्याने नवनिर्मितीत आणि प्रयोगशीलता दाखवतो.
एकूणच हर्षल हा ग्रह थोडं भन्नाट व्यक्तिमत्त्व दर्शवतो. काही वेगळेपण हे लोक सतत carry करतात आणि त्यात खूप सहजता असते. यांना दुसऱ्याकडून मात्र स्वतःसारख्याच सरलतेची अपेक्षा असते आणि ती पूर्ण न झाल्यास ते त्यांच्या हटके पद्धतीने react होतात. एकतर खूप चिडतील नाही तर टोकाचे नाराज होतील. अर्थात हे वैयक्तिक पत्रिकेतील ग्रहांवर अवलंबून राहील हे निश्चित. तेव्हा शेवटी एवढेच कि जन्म तारीख तुमचा स्वभाव ढोबळपणे दाखवते पण पत्रिका वृत्ती दर्शवू शकते. सध्या तरी यावरून आपल्याला पारखून स्वतः चा अंदाज बांधा आणि त्याबद्दल चे तुमचे मत नक्की comment करा. 

Tuesday, September 4, 2018

भाग्यांक तीन


तीन या अंकावर गुरू या ग्रहाचा अंमल आहे. गुरू हा सर्व ग्रहांमधील मोठा आणि खुप गुरुत्वाकर्षण असलेला शुभ ग्रह आहे. पत्रिकेत या ग्रहाचे स्थान व रास महत्वाचे ठरते कारण त्यावरून जातकाला एखादे शुभ फलित हमखास मिळणार का नाही हे ज्योतिषी ठरवतो. आता अंकशास्त्राप्रमाणे विचार करू. गुरु ग्रह ज्ञानगर्भ पांडित्य दर्शवतो. सद्विचार, नीतीमत्ता, सद्सद्विवेक बुद्धी या गोष्टी गुरुच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे अर्थातच तीन भाग्यांक असलेले लोक( ज्यांची जन्म तारीख ३,१२,२१,३० आहे.) हे उत्तम शिक्षक, मार्गदर्शक असतात. हे कोणत्याही क्षेत्रात असले तरी त्यातील पूर्ण बारकावे समजून घेण्याचा यांचा प्रयत्न असतो. कोणतेही काम वरवर करून मार्गी लावणे यांना जमत नाही. ज्ञानपिपासू असतात. कदाचित यामुळेच काही वेळा यांच्याकडून एखाद्या कामात वेळखाऊ पणा होतो, कारण यांना त्यांच्या पद्धतीने काम झाल्याशिवाय रुचतंच नाही. हे लोक काम अतिशय मनापासून करतात, पण याचा अर्थ ते कामाचा आनंद लुटतात असे मात्र म्हणता येणार नाही. ते वैयक्तिक स्वभावावर अवलंबून असेल असे मी म्हणेन. तीन भाग्यांक असलेले लोक सवयीने काम करतील. एकदा त्यांची पद्धत ठरली की ते दुसऱ्या गोष्टीत लक्ष घालतील आणि आधीचे काम handover करतील. दुसऱ्या व्यक्तीने ते यांच्यासारखे केले नाही, काही उणीव राहिली तर परत स्वतःवर ओढवून घेतील. मुळातच उत्तम मार्गदर्शक असल्याने असेल, पण यांची एखाद्याला स्वीकारण्याची वृत्ती देखील तितकीच प्रगल्भ असते. एखाद्याची पद्धत यांना स्वतःपेक्षा सरस वाटली तर ते खुल्या दिलाने स्विकार करतात. हे गुणदोष ३ आणि ३० या जन्मतारखेच्या लोकांमध्ये ठळकपणे दिसतील. १२ तारिख असलेले लोक म्हणजे रवी आणि चंद्र असे combination. या लोकांना अधिकार,आदर आणि मग प्रेम अशी अपेक्षा त्यांच्या पांडित्यपूर्ण वागण्यातून असते. तर २१ या अंकामध्ये हा क्रम बदलेल. ते लोक भावनिक पातळीवर समोरच्याला आपलंसं करतील आणि मग त्यातून आदर मिळवतील.
            थोडक्यात हे लोक इतरांच्या मनात guide & philosopher अशी प्रतिमा नक्की तयार करतील आणि स्वतः एखाद्या friend च्या शोधात असतील. यांच्या ज्ञान आणि भावना यांच्या levels काही औरच असतात. या सगळ्या गोष्टींची तीव्रता पत्रिकेतल्या ग्रहांवर कमीजास्त होईल हे निश्चित. हा एक निव्वळ आणि ढोबळ आढावा.
            आत्ताच्या पोस्टबद्दल ज्ञानी comment करतीलच. पुढच्या पोस्टमधे ४ भाग्यांकाचा विचार करू. नक्की भेटूया @ http://pradnyaastro.blogspot. com 

Wednesday, August 22, 2018

भाग्यांक २

भाग्यांक २
या अंकावर चंद्र या ग्रहाचा अंमल आहे. चंद्र कोणाला आवडत नाही? तसंच२ हा भाग्यांक असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत ही म्हणता येईल. चंद्राविषयी आपण काय म्हणू शकतो, तर तो शितल आहे... सुखद आहे.... आंनददायी आहे वगैरे. तसंच या भाग्यांकाच्या लोकांबाबत (ज्यांची जन्मतारीख२,११,२० किंवा २९ आहे) म्हणता येईल. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा ग्रह मनाचा कारक आहे. आपल्या मनात अनेक विचारांचे हिंदोळे असतात तसंच चंद्र ज्याच्या दर दिवशी काही कला कमी अथवा अधिक होत असतात. अमावस्येला तो पूर्ण लुप्त असतो तर पौर्णिमेला अगदी पूर्ण प्रकाशित असतो. थोडक्यात आपल्या मनाचे तरंग दाखवणारा असा ग्रह म्हणजे चंद्र अगदी बरोब्बर वाटतो. याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून समुद्राला भरती- ओहोटी येते, कारण चंद्र हा जलतत्व दर्शवतो. याचेच परिणाम आपल्याला मानसिक दृष्ट्या कमकुवत लोकांवर दिसतो. याचं शास्त्रीय कारण सांगायचं झालं तर हेच की आपल्या शरीरात ७०% पाणी आहे. असो विषयांतर होण्यापूर्वीच २ या आपल्या आजच्या अंकाकडे वळू या. तर एकूणच या अंकाच्या व्यक्ती जास्त भावनिक, दुसऱ्याचा जास्त विचार करणाऱ्या अशा असतात. थोड्या चंचल, कविमनाच्या असल्याने व्यावहारिक गोष्टीत फारसे रमत नाहीत. दुसऱ्यावर पटकन विश्वास ठेवून काही वेळा नुकसान करून घेतात तर काही वेळा आलेली संधी यांच्या लक्षातच येत नाही. ज्यांची जन्मतारीख २ किंवा २० आहे त्या लोकांच्या बाबतीत या गोष्टी प्रकर्षाने दिसून येतील. ज्यांची जन्मतारीख ११ आहे त्या लोकांची वेगळीच गंमत कारण मागच्या पोस्टमध्ये पाहिल्याचे तुम्हाला आठवत असेल की १ हा अंक रविचा आहे. रवि अधिकारी, अभिमानी वृत्ती दर्शवतो आणि हे लोक (२ अंकाचे) तर पूर्णपणे मनाच्या अंमलाखाली. यामुळेच ज्यांची जन्मतारीख ११ आहे त्या लोकांच्या बाबतीत हे ठामपणे सांगता येईल की हे अतिशय परोपकारी वृत्तीचे असतात. यांना कोणी मदत मागितली तर त्याला नाही म्हणणे या लोकांना जमत नाही, त्यांना कमीपणाचे वाटते. तसंच कोणाची मदत घेणे देखील यांच्या तत्वात बसत नाही. मिंधेपणा यांच्यात कधीच दिसणार नाही. २९ जन्मतारीख असलेले लोक म्हणजे चंद्र आणि मंगळ यांच्या माध्यमातून स्वतःचा स्वभाव दाखवतात. हे भावूक असतात आणि त्यांच्या भावना बऱ्याचदा चिडून, संतापून व्यक्त होतात. त्यामुळे या लोकांवर 'तापट' असा शिक्का लागतो पण वास्तविक ते खूप भावनिक असतात आणि जीव तोडून दुसऱ्याचा विचार करतात, फक्त समोरच्याविषयी वाटणारी काळजी, प्रेम व्यक्त करण्याची नेटकी पद्धत यांनी शिकायला हवी.
तर असे हे भाग्यांक २ चे अंतरंग. यांच्या गुणदोषावर मात करायला त्यांचा भाग्यांक तक्ता त्यांना नक्की मदत करू शकतो. त्यामुळे ते कदाचित थोडे सजग राहतील, थोडे संयमी होतील किंवा अधिक आत्मविश्वासू होतील.
तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्दल नक्की comment करा. तुमचे प्रश्न सुद्धा तुम्ही लिहू शकता. भाग्यांक तक्ता आणि अंकशास्त्रविषयी आणखी जाणून घेण्यासाठी login करा http://pradnyaastro.blogspot.com

Thursday, August 16, 2018

भाग्यांक एक

१ अंक


मागील पोस्टमध्ये मी भाग्यांक म्हणजे काय आणि कुठल्या अंकावर कोणत्या ग्रहाचा अंमल असतो याबद्दल सांगितले. आता १ अंकाविषयी थोडे जाणून घेऊ. या अंकावर रवि ग्रहाचा अंमल असतो असे आपण मागेच पाहिले. रवि म्हणजेच सुर्यामुळे ही सारी सृष्टी कार्यरत आहे, पूर्णत: त्याच्यावर सर्वजण अवलंबून आहेत. याचा अभिमानच वाटत असणार रवीला, नाही का? आणि का नसावा? पण हे त्या ग्रहाविषयी ठिक. माणसं जेव्हा हा अभिमान बाळगून असतात तेव्हा कधी त्याचं रूपांतर हळूच अहंकारात होतं; हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. अर्थात हे माझं बोलणं सगळ्यांसाठी लागू नाही बरं का....!
पण एकूणच ज्यांचा भाग्यांक १ असतो (जन्मतारीख १,१०,१९,२८) त्यांना स्वतः विषयी नितांत अभिमान असतो. त्यातही ज्यांची जन्मतारीख १० असते ते याबाबत प्रथम क्रमांकावर असतात कारण शून्य ( ० ) हा अंक कधीही त्याच्या आधीच्या अंकाचे महत्व/ किंमत वाढवतो हे व्यवहारातले तत्व इथेही लागू पडते. १९ अंकामध्ये रवि आणि मंगळ या ग्रहांचे गुणधर्म असणार. म्हणजेच हे लोक जास्त अधिकारी वृत्तीचे दिसून येतील. म्हणजे मी या लोकांना dominating म्हणते आहे असा गैरसमज करून घेऊ नका. पण या लोकांमध्ये अधिकार वापरताना  एक वेगळीच आक्रमकता येते. उत्तम output साठी लागणारे perfection यांच्यात उपजत आहे आणि कदाचित त्यामुळेच काही गोष्टी गृहीत धरूनच हे कामं करतात. (उदा. यांच्या डोळ्यासमोर जे ध्येय आहे ते इतरांनाही तितकेच सुस्पष्ट आहे असं यांना वाटतं आणि त्यानुसार यांचे आडाखे असतात. इतरांना यांचा आवाका झेपला नाही की हे upset होऊ शकतात.) २८ अंकावर सांगा बरं कोणत्या ग्रहांचा अंमल असेल? .... चंद्र आणि शनि. चंद्र म्हणजे आपलं मन, जे सतत वेगवेगळ्या गोष्टींकडे धावत असतं तर शनि म्हणजे अगदी तटस्थ, संयमी. म्हणजे चंद्राला जर आपण एखादा उथळ झरा म्हणलं तर शनि म्हणजे एक खोssल असा डोह म्हणावा लागेल. थोडक्यात ही जन्मतारीख असलेले लोक कधी इस पार तर कधी उस पार अशी वाटतील आपल्याला. काही जणांना ही सतत confused minded वाटतील तर काही लोकांना ही दरवेळी वेगळे रूप दाखवून चकित करणारे अवलिया वाटतील.
पण एकूणच या सर्व तारखांवर रविचे अधिपत्य आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे या सर्व लोकांची born leaders अशी व्याख्या करता येईल. प्रत्येकाला(या तारखांच्या लोकांना) हे साधता येईल का? याबाबत मात्र त्यांची जन्म पत्रिका अधिक सविस्तर पणे बोलू शकते. सध्या तरी आपले गुण-अवगुण यांचा अभ्यास करून आवश्यक वाटेल तिथे बदल करायला काय हरकत आहे?
So enjoy your leadership talent!

अंकशास्त्रावरून स्वतःला अजून ओळखायला वाचा आणि follow करा http://pradnyaastro.blogspot.com
हे article कसं वाटलं आवर्जून comment मधे लिहा.

So be in touch !

Saturday, August 4, 2018

Numerology

# Numerology works#
It works through your inner strength. The numbers actually enhance your positivity and clarity, which will lead to success!

What is success?
Anything which will give you satisfaction and peace of mind, if you have it then consider yourself as successful!

Get it done by The Numbers.
Your birth date is unique. It gives you a number for your life path. If you keep this number always with you, it is going to do miracle for you. Just stay connected with it as much as possible.

Keep a small chart of your BHANGYANK  with you always. You can keep it in your wallet, purse, cupboard or below your working PC.
Your positive mind and this number chart will go hand in hand and you will experience success, satisfaction & peace of mind.
You just have to keep it with you. To know more about BHAGYANK & Numerology keep reading and follow www.pradnyaastro.blogspot.com


Pradnya Tikhe. 🙏