Saturday, August 4, 2018

मम्मा ...

मम्मा ...


एकदा मी ठरवले आपणहि जरा मॉडर्न व्हायचं ,
आपणहि थोडं टिपटॉप रहायचं.
घट्टं बांधलेले केस सोडले मोकळे, हातहि बांगड्यांशिवाय होते रिकामे
जीन्स टिशर्ट अंगावर चढवली ... कपाळिची टिकलीही काढली.
शिरा सांजा पोहे यांना मारली काट,
इडली डोसे पिझ्झा यांचा घातला घाट.
वरचेवर आणले इंस्टंट फुड , सगळे म्हणाले झालाय भलताच मुड.
थोडे दिवस हा साज सगळ्यांनाच आवडला पण रोजचाच हा ढंग पाहुन सारयांचा ऱंग बदलला.
का रे बोलत नाहीस म्हणुन मुलाला विचारले ...
म्हणले तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या मम्मासारखेच तर मी केले.
तो म्हणाला आई बेस्ट फ्रेंड आवडतो मला पण त्याची मम्मा नाही आवडत
पिझ्झा मस्त बनवते ती पण शिरा नाही करत.
स्वत:ला ब्रॅंडेड कपडे सारखेच असतात , देवघरात देवाला मात्र खोटे सुगंधी हार असतात.
त्याची आई त्याला नेहमी चमच्यानी भरवते, घरात एवढे नोकर तरी ती कायम बिझि असते.
आई तु तिच्यासारखी नको होउस. तु आईच रहा..... मम्मा नको होउस.

No comments: