उकड
दुबई ट्रिप करून आलो. आता फक्त मुंबई - पुणे असा प्रवास बाकी होता. घराचे वेध लागले आणि त्याबरोबर प्रवासाचा शिणवटाहि जाणवायला लागला. कधी घरी पोचून निवांत झोपतो असं झालं होतं. आणि तेवढ्यात माझ्या ७ वर्षांच्या मुलीनी फर्माईश केली ... ''आई मला घरी जाउन मोदकाची उकड करून दे'' घरी पोचल्यावरहि तिचा हट्ट कमी होईना. रात्रीचे १०:३० वाजलेले आणि जेवणं व्हायची होती. तसा वेळ काही लागत नाही त्या उकडीला पण शरीरापेक्षा मन थकलं होतं. शेवटी "उद्या नक्की" या बोलीवर निजानिज झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बरोबर आठवण झाली आणि मग मीही लगेच किचनकडे मोर्चा वळवला. लेकहि आईचा सुगरणपणा बघायला सरसावली. म्हणते कशी ..... मी शिकून घेते उकड तुझ्याकडून. आता हिला उकड करणं खूप कौशल्याच असतं असं दाखवायला हवं असं वाटलं. नाहीतर थेट विचारलं असतं तीने कि एवढी सोप्पी असते तर कालच का नाही दिलीस करून?
म्हणून मी एक एक सांगायला लागले. थोडंसं तेल.... त्यावर अलगद पाणी नाहीतर ते आपल्याच हातावर उडून भाजेल... प्रमाणात मीठ - साखर. पाण्याला उकळी आली कि पिठि अगदी मोकळी करत घालायची... गुठळ्या होऊ नयेत म्हणून चांगलं ढवळायचं. हे सांगताना मी अगदी वेगात ढवळूनहि दाखवलं. मुलीला उकड करणं म्हणजे खायचं काम नाही असं वाटलं. माझं कौतुक करून पोटभर खाल्ली. माझ्या तृप्त मनात विचार सुरू झाले... आपलंहि जगणं असच आहे. पातेल्यातल्या उकळत्या पाण्यासारखं......... अनेक प्रसंगाच्या उकळ्या सतत फुटत असतात. यात आपण आपुलकीची साखर आणि अनुभवाचं मीठ टाकायचं. आपलं रोजचं कर्म सफाईदारपणे त्यात घालताना मान- अपमानाच्या गुठळ्या लगेच तयार व्हायला लागतात. पण त्या मोडून काढायच्या. मनगटात जबाबदारी घेण्याची तयारी हवी. तिच्या जोरावर प्रेमाच्या झाऱ्याने घोटूनच काढावं लागतं तेव्हा या गुठळ्या मोडतात आणि मउसुत उकड तयार होते (तरीसुद्धा राहिलीच एखादी तर ज्याच्यासाठि करतोय त्यानी स्वीकारावी असेल तशी) सरतेशेवटी आच लागायला संयमानं झाकणबंद करायची आणि अलगद रटरटणंहि शांत करायचं.
---- प्रज्ञा तिखे.

No comments:
Post a Comment