प्रेमळ आई होण्याचा संकल्प......
दर वर्षी ३१ डिसेंबरला मी काहीतरी नवीन ठरवते. यंदाच्या वर्षी काय ठरवावं असा विचार करताना अचानक साक्षात्कार झाला कि, आपली मुलं खूपच गुणी आहेत. आपण जे सांगू ते ऐकतात (...... आपली चिडचिड झाल्यावर ऐकत असतील ... पण ऐकतात.) अभ्यासात पहिला नंबर नाही येत ; पण निदान तुमची मुलं ढ आहेत असं तर नाही ऐकावं लागत! (त्यासाठी भले आपल्याला काय काय दिव्य करावी लागत असतील) आपली मुलं घरात जाम पसारा करतात... पण कुणाची नाही करत? तर अशा या सद्गुणी मुलांची आई असूनहि मला त्यांची प्रेमळ आई मला होता येउ नये? असा भावनिक प्रश्न मला पडला आणि या वर्षीचा संकल्प ठरला. काहीही झालं तरी मुलांवर चिडायचं नाही; त्यांना ओरडायचं नाही एवढ्यावरच न थांबता आपण त्यांच्याशी प्रेमानी वागायचं असा दृढनिश्चय मी केला आणि जे मी ठरवते ते मी करतेच! (!?)
आता एवढी मोठी गोष्ट ठरवली तर कोणालातरी सांगायला नको? नवऱ्याला हा निर्णय सांगितला तर तो तटस्थपणे ऐकेल; प्रोत्साहन देणार नाही म्हणून तो बाद. सासूबाईना खरं वाटणारच नाही आणि आई .....? हो आईला सांगितला मी. पण माझी आई मला म्हणाली " प्रयत्न कर. " तिच्या या वाक्यावर मला अगदी आव्हान दिल्यासारखं वाटलं.
माझं मुलांशी वागणंच बदललं. मी खूप हसून आणि मोकळेपणी बोलु लागले. अभ्यास घ्यायच्या भानगडीत न पडता फक्त तो करणं कसं महत्वाचं आहे एवढंच सांगून गप्प झाले.(खरं म्हणजे मी जरा गप्प गप्पच झाले..)त्यांच्या मित्र- मैत्रिणींना घरी बोलवायला लगेच होकार देउ लागले. त्यांच्या आवडीचे पदार्थ न मागता देउन त्यांचे स्तिमित झालेले चेहरे पाहिले कि मी यशस्वी होते आहे असं वाटलं.आणि त्या नादात मी मुलांना माझ्यात झालेल्या बदलाचं गुपित सांगितलं. मुलानी थेट प्रश्न विचारला ; " म्हणजे तु चांगलं वागण्याच नाटक करते आहेस आई? " अस्सा पारा चढला माझा....... ' मी कधीच खोटं वागत नाही.... इथपासून ते मी त्यांच्यासाठी कित्ती केलं; मला कुठल्या गोष्टींचा राग आला आणि तो मी कसा आवरला... ते सारं करताना मला झालेला त्रास कसा सहन केला..... इथपर्यंत सगळं एका दमात त्याला बोलून दाखवलं..... शांत वाटलं. पाच मिनिटांनी मुलानी खांद्यावर हात ठेवून म्हणलं ' रिलॅक्स आई ' माझ्या डोळ्यात टचकन पाणीच आलं. म्हणलं ' तुम्ही कसं रे प्रेम करता एवढं ?' तर जरास लाजत म्हणाला " मी शहाण्यासारखं वागायचं ठरवलंय. " ..... तो जिंकला होता! मला माझ्या लाख हार मंजूर त्याच्या अशा जिंकण्यासाठी. त्याला प्रेमाने कुशीत घेऊन म्हणलं Happy New Year!
--- प्रज्ञा तिखे.

No comments:
Post a Comment