✡️मासिक राशिभविष्य✡️
ऑगस्ट २०१८
♈ मेष :- तुमची काम करण्याची वृत्तीच 'दे धडक बेधडक' अशी. या महिन्यात तर कामाचा उरका पाडायला ग्रहांचीहि साथ आहे, पण म्हणून कामाचे डोंगर उपसू नका. याचा तुमच्या वैवाहिक आयुष्यावर / तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. त्याकडे लक्ष ठेवा. विवाहेच्छूक मंडळींना सबुरीचा सल्ला. शिक्षण क्षेत्रातील लोकांच्या हातात काही अधिकार येतील. थोरामोठयांच्या ओळखीचे योग. सेवा वृत्ती आणि अधिकार वृत्ती यांचा योग्य समतोल राखा. त्यातून येणारे अनुभव खूप काही देऊन जातील.
♉ वृषभ :- खावे-प्यावे मस्त जगावे असं फार आवडतं ना! कामाच्या वेळी झोकून देऊन काम आणि मग आराम असा तुमचा स्वभाव. पण निवांत वाटण्यासाठी मनोरंजनावर जरा जास्तच खर्च होत नाही ना? याचा थोडा विचार करा. महत्वाकांक्षे पाठोपाठ जबाबदारी आणि ती पार पाडायला थोडाफार त्याग हे स्वाभाविकच आहे. म्हणतात ना, "कुछ पाने के लिए कुछ खोना पडता हैं|" मग काय नाही मिळालं तरी चालेल हाच विचार करा. जोडीदाराचं मन राखणं तुम्हाला छानच जमतं, पण तरी त्याच्या भलत्याच काळज्यांना खतपाणी घालू नका.
♊ मिथुन :- काही असो किंवा नसो ; आपल्याला पाहिजे ते मिळवल्याशिवाय राहायचं नाही, ही जिंदादिली फक्त तुमच्यातच आहे. सध्या तुमच्या या स्वभावाला थोडी खीळ बसते आहे. वाहनसौख्य, इतर करमणूक यातून जरा अंग काढून घ्यावं असं वाटेल. पण फायदा हा की देवाधर्माच्या बाबतीत पुढाकाराने सामील व्हाल. जोडीदाराचीही मूकपणे सोबत लाभेल. त्यांच्याबरोबर तीर्थक्षेत्री जाण्याचे तुमचे मनसुबे तुम्हाला तरी निश्चित फायद्याचे ठरतील. पण फार धीरगंभीर होऊ नका.... पुढच्या महिन्यात गाडी रुळावर येईलच की. कामाच्या ठिकाणी तुमचा वावर लोकांना तुमचं वेगळं रूप दाखवेल. बाकी शेअर्स, लॉटरी याबाबत 'जपून टाक पाऊल जरा...'
♋ कर्क :- दुसऱ्याच्या चष्म्यातून स्वतःकडे पाहता आणि उगाचच दडपण घेता. सध्या दिवस तुमचेच आहेत. सर्व आघाड्यांवर तुम्हाला कष्टाच्या मोबदल्यात यश नक्की मिळेल. घरच्यांचा पाठिंबा मोलाचा राहील. विरोधक सध्या निष्प्रभ आहेत पण त्यांच्याबाबत गाफील राहू नका. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. एखादं जुनं दुखणं डोकं वर काढेल किंवा त्याच्या धास्तीत तुम्ही राहण्याची शक्यता जास्त. जोडीदाराला गृहीत धरून चालणार नाही, अन्यथा त्याचा तुमच्या नात्यावर परिणाम होईल. व्यवसायात भागीदारी करताना सतर्क राहा.
♌ सिंह :- तुम्ही तर एकदम राजा माणूस! तुमचा मान सांभाळून दुसऱ्यासाठी जे करता येईल ते नेहमीच करता. सध्या मात्र कौटुंबिक, सामाजिक जबाबदाऱ्या, याचं सारं जोखड आपल्याच मानेवर आहे अशा काहीशा विचारांनी त्रस्त आहात. पण काळजी करू नका. लवकरच तुम्ही आत्ता घेतलेल्या कष्टांचा आर्थिक मोबदला मिळेल. तुमच्या विरोधकांचे कुरघोडीचे छुपे प्रयत्न चालू असतील पण लवकरच तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल. सध्या तरी 'आपण बरे आणि आपले काम बरे' असा विचार करून स्वस्थ राहा.
♍ कन्या :- तुम्ही मुळातच स्वतःत रमणारे. आर्थिक, कौटुंबिक पातळीवर आलबेल असेल तर जगाला सल्ले द्यायला तुम्ही मोकळे. मुलांच्या प्रश्नात स्वतःला फार गुंतवून ठेवू नका. तुम्ही मदत नक्की करू शकाल पण त्यांच्यासाठी इतर मार्गही आहेत. कौटुंबिक बाबतीत जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. मित्रमैत्रीणीमधे आनंदी राहाल. त्यांच्याकडून काही लाभ मिळवाल. मनोरंजनावर भर राहील. हे सर्व मनापासून उपभोगा मात्र त्याचबरोबर तब्येतीच्या तक्रारी चोरपावलांनी येऊ पहात आहेत तेव्हा त्याबाबत सावध रहा.
♎ तूळ :- सध्या अपेक्षांचं ओझं खूप जाणवतंय ना! घरात काही बारीकसारीक कुरबुरी असतातच त्यात संयम आणि तटस्थ वृत्ती बाळगली तर मन:शांती मिळवू शकाल.
मुलांविषयी एखादी गोष्ट अस्वस्थ करत राहील पण तुम्ही निश्चितच त्यांना योग्य तो मार्ग दाखवण्यास समर्थ आहात व याची जाणीव मुलांनाही लवकरच होईल. यात जोडीदाराची मदत मिळेल. काही अचानक धनलाभाची संधी मात्र गमावून बसाल. व्यवसायातील भागीदार तुमच्या हक्काचे लाभ स्वतःच्या नावावर तर घेत नाही ना याबाबत सावध रहा.
♏ वृश्चिक :- साडेसाती कधी संपेल? अजून अवकाश आहे. जमा खर्चाची सांगड घालताना आर्थिक घडी हवी तशी बसत नाही. पण आता मानसिकता थोडी सावरली आहे त्याचवेळी योग्य विचार करून निर्णय घ्या. पैसा एकरकमी तुमच्या हातात येणार नाही हे ध्यानात ठेवूनच पुढची गुंतवणूक करा. घरातले वातावरण गूढ वाटेल. उष्णतेचे विकार डोकं वर काढतील. मुलांकडे थोडं त्रयस्थपणे पाहा. जोडीदाराची आर्थिक व इतर पातळ्यांवरही योग्य साथ राहील.
♐ धनू :- मुळात तुम्ही सगळ्यात राहून अलिप्त राहणारे. एका गोष्टीत मात्र तुम्हाला स्वस्थता नाही; आणि ते म्हणजे कोणावर झालेला अन्याय. त्यातून आता शनी महाराज तुमच्याच राशीत वास्तव्यास आले आहेत. ते तुम्हाला फार त्रास देत नाहीत पण मूळचीच अलिप्तता अजून वाढीस लागेल. तुम्ही स्वस्थ असलात तरी कुटुंबाला याची झळ बसून त्याचे पडसाद उमटतील. आपसूकच देवाधर्माची कार्य घडतील. नोकरदारांना सध्या तरी ग्रहमान ठिक पण व्यावसायिकांनी मात्र गुंतवणूक काळजीपूर्वक करावी, नाही तर मनस्ताप सहन करावा लागेल. संतती आक्रमक पवित्रा घेऊ शकते. त्यांच्यावर वचक ठेवायचा तर शिस्तीचा बडगा उगारून उपयोग नाही. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्यासाठी पुढाकार घ्या.
♑ मकर :- 'करावे एक आणि व्हावं भलतंच' असं तुमच्या बाबतीतहोतं. काही तरी अस्वस्थता , स्वतःचीच उलघाल होते आहे तरी सावरून घेताय ना स्वतःला? आदर मिळतो पण अधिकार नाही अशी काहीशी परिस्थिती आहे. आणि त्याचा परिणाम गृहस्वास्थ्य बिघडण्यात दिसून येतोय. तसंच साडेसातीचा परिणाम म्हणून पैशाला अनेक वाटा फुटलेल्या दिसत आहेत. मिळालेल्या रकमेत समाधान मानावं लागेल. यात कानमंत्र एकच की कौटुंबिक पातळीवर आपल्या बद्दल काय विचार चालू आहेत या विचारांनी उगाच त्रस्त राहू नका. साडेसाती आत्ता कुठे पहिल्याच टप्प्यात आहे म्हणून पुढच्या आघाड्या गाठण्यासाठी आत्तापासून योग्य उपासना करा. आर्थिक गणित लवकरच सोडवाल.
♒ कुंभ :- तुमच्या बौद्धिक पातळीवर येऊन संवाद साधू शकणारे फारच कमी असतात. त्यात सध्या काही गूढ अनुभव घेण्याचा तुमचा मानस दिसतो आहे. तेव्हा जे मनात असेल ते प्रवाही कसं होईल? याचा विचार जरूर करा. शक्यतो तुमचा अनुभव मित्रमैत्रिणीना नक्की सांगा. आर्थिक बाजू भक्कम नसली तरी समाधानकारक आहे. एकरकमी पैसा हाती आला नाही तरी हळूहळू वसुली होत राहील. व्यवसायात कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीबद्दल साशंक राहाल. काही वेळा प्रक्षोभक विचार मनात येतील त्यावर योग्य उपासनेने अंकुश मिळवाल. जोडीदार आत्ता जरी व्यग्र असला तरी लवकरच सूत्र हाती घेऊन तुमच्या मदतीस सज्ज असेल. घरातील वातावरण आत्ता जरी मनासारखे नसले तरी काही दिवसांनी चित्र बदलेल. मुलांच्या तब्येतीची काळजी वाटेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
♓ मीन :- भाबडेपणात तुम्हाला कोणी मागे टाकू शकत नाही. याचमुळे एखाद्या अनाठायी भीतीने अस्वस्थ राहाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही दाखवत असलेला संयम हा तुमच्या सहकाऱ्याना नामंजूर असू शकतो, तेंव्हा सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. मित्रमंडळींशी संबंध थोडेसे बिघडण्याची शक्यता आहे. जोडीदाराची योग्य साथ लाभेल. त्यांचा विचार करून केलेली कामे आनंददायक ठरतील. कुटुंबाबरोबर घालवलेला वेळ तुमचे मनस्वास्थ्य टिकवेल.

3 comments:
Numerology always gave me the best experience. I personally Interacted with many numerologists for business and personal numerologyNumerology Consultantwebsite earlier, check it out once
If you are worried and facing financial problems in your life then don’t worry. Contact the Famous Astrologer in the USA, Pandit RamDial Ji by book an appointment and you can also call him directly. Chat or Whatsapp options are also available for you.
best indian astrologer in new york
I HAVE READ THROUGH YOUR LITERATURE ON NUMEROLOGYsynonymous to numerology calculator and i have shared details about the same via my website
Post a Comment