भाग्यांक सात
सात हा क्रमांक अंकशास्त्रनुसार 'नेपच्यून' या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. ज्योतिषीय दृष्ट्या पत्रिकेत नेपच्यून ज्या भावात असतो तिथे एक प्रकारची गूढता किंवा गुप्तता दर्शवतो. त्यामुळे सात हा भाग्यांक असणारे (ज्यांची जन्म तारीख ७,१६,२५ आहे.) असेच गूढ व्यक्तिमत्त्व बाळगून असतात असं म्हणता येईल. नेपच्यून हा ग्रह जास्त करून भावना, जाणीवा यांमधून प्रतित होतो. प्रार्थना करताना जाणवणारा अंतरनाद, एखाद्या वाद्यातुन छेडली गेलेली सुरावट अशा अमूर्त, अव्यक्त जाणीवांवर या ग्रहाचा अंमल असतो. कदाचित यामुळेच सात भाग्यांक असलेले लोकं मोकळेपणाने व्यक्त होत नसावेत. सतत आत कुढत रहाण्याची सवय असते. दु:खी चेहऱ्यानेच वावरतील असे नाही, पण काहिनाकाही शल्य हे लोक बाळगुन असतात. जन्म तारखेमधे ७ हा अंक वारंवार येत असेल तरी ही शक्यता आहे. आता तारखेप्रमाणे विचार करू.
१६ या तारखेमधे रवि आणि शुक्र ही जोडी दिसून येते. रवी म्हणजे अधिकार, अभिमान, अहंकार तर शुक्र म्हणजे आनंदी व्यक्तीमत्व, ज्याला कलेची आवड/जाण आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून अधिकार मिळाल्यास आनंदीत होणारे. या लोकांकडे निश्चित काही कला असू शकते. ती त्यांनी जोपासावी, खुलवावी. आणखी एक विचार, कि शुक्र हा अतिशय तेजस्वी ग्रह आहे. पहाटेच्या वेळी शुक्राची चांदणी अगदी लोभस आणि खुलून दिसते. रवीच्या सान्निध्यात त्याचे तेज अंशतः झाकोळते. सोळा जन्मतारीख असलेल्या लोकांना देखील असा अनुभव असेल की स्वतःच्या अधिकार व मानमरातब मिळवण्याच्या त्यांच्या ज्या जागा आहेत तिथे त्यांचे कलाप्रिय मन झाकोळून जाते. आणि त्यात अव्यक्त रहाणारा नेपच्यून काम करतो. यांचा भाग्यांक तक्ता कदाचित यांना नवनवीन संधी देऊन किंवा थोडा मोकळेपणाने वागण्याचा विचार देऊन त्या शुक्राला उल्हासित ठेवण्यात मदत करू शकेल. २५ जन्म तारीख म्हणजे चंद्र व बुध असं combination. ज्योतिषीय परिभाषेत बुध हा चंद्राला शत्रू मानतो. (त्याबद्दल एक आख्यायिका आहे, ज्यात मी आत्ता शिरत नाही.) चंद्र चंचलता आणि बुध द्वैत्व दर्शवतो. वरवर पाहता दोघांचे गुणधर्म सारखेच. पण त्यांचे शत्रुत्व असल्याने या लोकांचे स्वतःशीच सतत द्वंद्व चालू असते, परिणामी निर्णय घ्यायला वेळ लागतो, घेतलेल्या निर्णयाचे समाधान नसते आणि झालंच सगळं सुरळीत तरीसुद्धा एक विचित्र साशंकता यांना सतत घेरून रहाते. पण या व्यक्ती मृदू स्वभावाच्या आणि हुशार असतात. यांच्या या गुणांची व्यापकता वाढवून त्यांच्या स्वभाव दोषांवर मात करण्यास भाग्यांक तक्ता फायद्याचा ठरू शकतो.
एकूणच नेपच्यून हा ग्रह गूढ, गोपनीय, अदृश्य, अव्यक्त अशा गोष्टींचा कारक आहे. त्याच्या अंमलाखाली असलेल्या लोकांनी ध्यान, मानसपूजा, ओंकार साधना या अनुभूतींच्या शास्त्राचा अभ्यास वाढवून आपल्या जाणीवा आणखी दृढ कराव्यात, उपासना वाढवावी आणि स्वानंदाचा अनुभव घ्यावा. तुमचे अनुभव आणि या लेखाविषयीचे तुमचे मत नक्की व्यक्त करा आणि आणखी चर्चा करण्यासाठी follow करा, http://pradnyaastro.blogspot.com

No comments:
Post a Comment