सौ प्रज्ञा तिखे
(ज्योतिष शास्त्री)
घरात कोणी उपवर मुलगा किंवा मुलगी असली की घरात पंचांग, पत्रिका, गोत्र अशा चर्चा सुरू होतात. आधी love की arrange यावरून बरीच खलबतं झालेली असतात, दोघांना आईवडिलांनी प्रत्यक्ष किंवा आडून-आडून विचारुन झालेलं असतं आणि त्यांचा green signal मिळाला कि 'नावनोंदणी' झालेली असते. ज्यांचा पत्रिकांवर विश्वास नाही त्यांनादेखील नियमांमध्ये राहून विवाह मंडळात पत्रिका रजिस्टर करावीच लागते. तर काही मुलं ही स्वतःहून पत्रिका गुणमेलन दाखवणारे apps download करून त्यावर आपला 'choice' बसतो का हे पडताळून घेणारेही असतात. ( हा अनुभव मला एका विवाहमेळ्यात 'ज्योतिषी' म्हणून गेले असताना आला आणि फार गंमत वाटली.) पण एकूणच पंचागात जो गुणमेलनाचा तक्ता दिला आहे तो पाहून १८ च्या वर गुण दिसले कि 'हूश्श' करणारे लोक असतात, हा आकडा अजून वरचा असला तर आनंदतात आणि ३६ गुण असले तर jackpot लागला असे समजणारेही असतात. तर अनेकांच्या मनाचा गोंधळ उडतो कि पत्रिका पहावी का नाही?
पण मुळात हे गुणमेलन कशासाठी? आणि जास्तीत जास्त गुणांनी पत्रिका जुळते म्हणजे नेमके काय? आत्ताच्या chatting वरून स्वभाव, आवडी-निवडी जुळतात हे लक्षात घेऊन लग्नाची मजल मारणाऱ्या पिढीला या गुणमेलनाची आवश्यकता आहे का? या साऱ्याची चर्चा करण्यासाठी हा लेख.
आता आधी गुणमेलन म्हणजे काय? तर पत्रिकेत वधू/ वराच्या वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रहमैत्री, गण, राशीमैत्री व नाडी असे अनुक्रमे चढत्या भाजणीचे निकष आहेत. यात वर्ण जास्तीत जास्त १ गुण, वश्य ला २ गुण अशा प्रकारे १+ २ ........ +८ असे एकूण ३६ गुण पत्रिकेला लावले जातात. यातला प्रत्येक निकष हा आयुष्याच्या वेगवेगळ्या अंगांना निर्देशित करतो. उदा. वर्ण -- तुमची धनप्रवृत्ती दर्शवेल, गण -- स्वभाव वृत्ती, तारा दुसऱ्या बद्दलचा दृष्टिकोन वगैरे. पण एकूणच हे सारे निकष तुमचा स्वभाव व आरोग्य या बाजूने विचार करणारे आहेत, जे विवाहाच्या दृष्टीने महत्वाचेच आहेत. आता जेव्हा जास्तीत जास्त गुण जुळतात तेव्हा नेमके कसे असते तर तुमच्या सकारात्मक तसेच तुमच्या नकारात्मक बाबतीतही समोरचा तुम्हाला पुरक असतो हे दिसते. एखादी मुलगी तापट स्वभावाची आहे तिची पत्रिका एखाद्या मुलाशी ३६ गुणाने जुळली तर मुलगाही तापटच असणार हे नक्की. (फक्त उदाहरणा दाखल सांगते आहे.) किंवा दुसरे महत्वाचे उदाहरण घेऊ कि समजा मुलाच्या पत्रिकेत संततीयोग विलंबाने आहे आणि चांगल्या गुणांनी जेव्हा पत्रिका जुळते तेव्हा शक्यता आहे की मुलीच्या पत्रिकेतही संततिप्राप्ती उशीरा आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की पत्रिका अधिकाधिक गुणांनी जुळते तेव्हा ती दोघांच्या +ve तसेच --ve बाजूदेखील तौलनिक दृष्टया सारख्या पातळीवर आणते. मग आता पुढचा मुद्दा लगेच येतो कि म्हणजे ३६ गुणी नकोच का? तर असे नाही. नेमक्या कोणत्या बाबी जास्त समर्पक आहेत हे ज्योतिषाला उत्तम कळते, म्हणून त्यांचे काम त्यांनाच करू द्या. एखाद दोन बाबतीत आयुष्यभर adjust करावं लागतं कारण विवाह म्हणजे एक प्रकारची तडजोडच आहे. त्या एकदोन गोष्टी नेमक्या कोणत्या हे तज्ञ ज्योतिषी नक्कीच सांगू शकतात आणि सांगण्यास अभिमान वाटतो की ज्योतिषीदेखील केवळ पठडीतले गुणमेलन सांगून वाटेला न लावता उत्तम councelling ही करू शकतात. उदा. एका मुलाने त्याच्या मैत्रिणीची पत्रिका स्वतःशी जुळवण्यास आणली. त्यात मुलगी उधळ्या स्वभावाची आहे असा मुद्दा निघाला, पण मुलाच्या पत्रिकेत अर्थप्राप्ती उत्तम होती. मुलीच्या बाबतीत तिचा खर्चिक स्वभाव स्वीकारायची तयारी असल्यास पुढे जायला हरकत नव्हती. त्याप्रमाणे 'मागणी' आणि 'पुरवठा' बिनदिक्कत चालू राहून सुखी संसार चालू आहे...... एकूणच पत्रिकेचे गुण १८ पेक्षा जास्त असतील तर उत्तमच आहे पण जर कमी असतील तर तज्ञ ज्योतिषाकडून नेमके काय जुळत नाही... कुठे कसर आहे हे नीट विचारून घ्यावे. त्याबाबतीत तुम्ही जुळवून घेण्याची क्षमता बाळगून असाल तर well and good. पण हल्ली love marriage चा जमाना आहे आणि पत्रिका पाहिलीसुद्धा जात नाही, मग लग्नानंतर काही प्रश्न उदभवले की उपाय विचारले जातात त्यापेक्षा आधीच तुम्हाला प्रश्नाचे स्वरूप कळले तर उत्तम, नाही का?
अनोळखी देशात प्रवेश करण्यापूर्वी तिकडच्या हवामानाचा अंदाज असला म्हणजे त्याला अनुसरून आपण आपला 'पेहराव' ठरवतो तसंच ज्याच्याबरोबर आयुष्य घालवायचं आहे त्याच्या स्वभावाचा, क्षमतांचा आणि मर्यादांचा अंदाज पत्रिकेवरून येतो. त्यात कुठे कुठे adjust करावं लागेल याचं तज्ञ ज्योतिषी मार्गदर्शन करेलही पण त्याप्रमाणे आपल्यालाच पूर्ण आयुष्य काढावं लागेल हे लक्षात घेऊन भानावर राहुनच निर्णय घेण्याचे काम करायला हवे.
जे विवाह या संकल्पनेविषयी पूर्ण प्रगल्भ आहेत त्यांच्या बाबतीत गुण कमी जुळत असले तरी हरकत नाही असे माझे ठाम मत आहे. मात्र ही प्रगल्भता दोन्ही बाजूत असली पाहिजे. अजून एक प्रश्न असतो तो म्हणजे पत्रिका चांगली जुळुनही विवाह का टिकला नाही असा. यात मी म्हणेन की ज्योतिष जाणकाराची काही टक्के चूक असेलही, पण बऱ्याचदा वधू- वरांच्या आनंदाला महत्त्व देण्यापेक्षा इतर व्यवहारीक फायदा पाहून लग्नाला भरीस पाडणारेही कमी नसतात. पूर्ण कल्पना देऊनसुद्धा काही वेळा लग्नाचा घाट घातला जातो. असो, तो ज्याच्या त्याच्या वैयक्तिक विचारांचा भाग आहे. आता मुख्य मुद्दा असा की पत्रिकेत गुण किती जुळले पाहिजेत? तर आपल्या दृष्टीने नेमके महत्त्व कशाला आहे ते नीट लक्षात घेऊन त्याला पूरक अशी जी पत्रिका असेल ती पत्रिका जरी १८ पेक्षा कमी गुण दाखवत असेल तरी हरकत नाही. (तुम्ही प्राधान्य कशाला देता हे महत्त्वाचे आहे.)कमी गुण जुळत असूनही सुखी संसार असलेली कुटुंब पहाण्यात आहेत हे आवर्जून सांगते. पत्रिका नीट पाहून त्यातील गुण-दोष लक्षात घेऊन त्यात समतोल राखणारी पत्रिका असल्यास उत्तमच अन्यथा जास्त गुण जुळणारी पत्रिका हा पर्याय सदैव खुला आहेच. योग्य मार्गदर्शन, सल्ला आणि त्यापुढे तो अंमलात आणण्याची तुमची जागृत विवेकबुद्धी हीच यशस्वी सहजीवनाची पायरी आहे. शेवटी म्हणतात ना..... SUCCESSFUL MARRIAGE REQUIRES FALLING IN LOVE MANY TIMES, ALWAYS WITH THE SAME PERSON.
सौ प्रज्ञा तिखे
(Ph. 7776058784)
Please follow my blog , if you find it informative!!
2 comments:
खुप छान ताई
धन्यवाद!
Post a Comment