भाग्यांक नऊ
भाग्यांक क्रमांक ९ हा मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. ज्योतिषीय दृष्ट्या मंगळ हा ग्रह शौर्य, बेधडक वृत्ती, तापट स्वभाव दर्शवतो. तो लढाऊ वृत्तीचा असला, तरी त्याच्याकडे गुरू सारखे नियोजन, शनि सारखी संयमी वृत्ती, रवीचा अधिकार नाही. त्यामुळे एक घाव दोन तुकडे, तडकाफडकी घेतलेले निर्णय आणि मग त्याचे भोगावे लागणारे परिणाम त्याचा ठपका या ग्रहावर आहे. पण तरीसुद्धा, जिगरबाज नेतृत्व, लढाऊ वृत्ती प्रचंड आत्मविश्वास हे गुणही हाच ग्रह दर्शवतो. यामुळेच नऊ हा भाग्यांक असलेले लोक ( ज्यांची जन्मतारीख ९, १८, २७ आहे) स्वकर्तुत्वावर विश्वास असणारे, जे जे चॅलेंजिंग वाटेल ते करायला उत्सुक असणारे असतात. १८ तारीख म्हणजे रवि आणि शनि यांचे combination. ज्योतिषीय दृष्ट्या हे दोघे शत्रू ग्रह आहेत तर पौराणिक कथानुसार शनि हा रवीपुत्र आहे. रवि आत्माकारक, तेजस्वी, ग्रहमालेचा राजा म्हणून अधिकार व अहंकार बाळगणारा शनि संयम, चिकाटी पण विलंब आणि नैराश्य दाखवणारा असा आहे. यामुळे या तारखेचे लोक जेव्हा एखादे काम हाती घेतात तेव्हा त्याचे संपूर्ण नियोजन, योग्य आराखडा त्यांचा तयारच असणार. सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे होतात ना हेही ते सतत जोखत असतात, आणि मंगळाचे अधिपत्य असल्याने कामाची पूर्तता होईपर्यंत ते स्वस्थ रहात नाहीत. मूळ पत्रिकेतील हे तीन ग्रह कसे आहेत हेही महत्वाचे आहेच. जर दुर्दैवाने यातील कोणताही ग्रह कुयोगात असेल म्हणजेच स्वतःचे सकारात्मक परिणाम देण्यात कमी पडत असेल तर यांच्या या गुणांचे म्हणावे तसे कौतुक होत नाही आणि मग एक अस्वस्थता यांना ग्रासू लागते. पण एकूणच या तारखेचे लोक म्हणजे 'नाद करायचा नाय' असेच असतात. २७ तारिख म्हणजे चंद्र आणि नेपच्यून यांची जोडी. यांची कल्पना शक्ती अफाट असणार. चंद्र म्हणजे चंचलता, प्रेम आणि नेपच्यून म्हणजे भावविश्व. हे ज्या गोष्टी शब्दातीत असतात त्या अनुभवू शकतात. अव्यक्त अशा भावना, अवर्णनीय सौंदर्य वगैरे हे मानसिक स्तरावर अनुभवतात, पण म्हणून हे सारखेच कल्पनाविश्वात रममाण असतात असं नाही कारण ultimate effect हा मंगळाचा असतो. अनेक अनुभव घेऊनही हे लोक भानावर रहातात. यामुळेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं यांना सहज असतं. असं असलं तरी काही वेळा हे चुकीचं ठरू शकतं, पण तरी पत्रिकेतला मंगळ शुभयोगात असल्यास निदान यातून तयार होणारा आडमुठेपणा यांच्या स्वभावात असणार नाही आणि वागण्यात एक सादगी असेल हे नक्की.
या भाग्यांकाच्या लोकांमध्ये मुळातच स्वभावदोष कमी असतात असं म्हणायला हरकत नाही. आहेत ते गुण अधोरेखित करण्यासाठी भाग्यांक तक्त्याचा निश्चित उपयोग होईल. बाकी यांच्याकडे पाहून एकच गाणं आठवतं, ते म्हणजे ' हमसे है यह जमाना , दुनिया को है दिखाना .....!' so enjoy your energy with patience.

No comments:
Post a Comment