बालारिष्ट योग-
आयुर्दाय पाहताना लग्नस्थान, लग्नेश यांचा रोगप्रतिकारशक्ती, आरोग्य, स्वभाव या दृष्टिकोनातून विचार केला जातो. आरोग्याचा कारक ग्रह रवि, मनाचा कारक ग्रह चंद्र, अष्टमस्थान व अष्टमेश तसेच आयुष्य / मृत्यू याचा कारक ग्रह शनि यांचा विचार केला जातो. या सर्वापैकी जास्तीत जास्त गोष्टी बलवान असता चांगला आयुर्दाय लाभू शकतो. ज्या प्रमाणात बिघाड झाला असेल त्या प्रमाणात आयुर्दाय कमी होणे अथवा गंडांतर येणे या गोष्टी होऊ शकतात. वरील ग्रह जेव्हा राशी गंडांत, नक्षत्र गंडांत (म्हणजेच कर्क - सिंह संधी, आश्लेषा- मधा नक्षत्र संधी, वृश्चिक - धनु संधी, ज्येष्ठा मुळ नक्षत्र संधी व मीन- मेष संधी, रेवती अश्विनी नक्षत्र संधी या भागात असतात ) तसेच तिथी गंडांत मध्ये जन्म असल्यास (म्हणजेच पंचमी- षष्ठी, दशमी- एकादशी आणि पौर्णिमा/ अमावस्या व प्रतिपदा असता ) मृत्यूसारखी स्थिती उद्भवू शकते. वय वर्षे १२ पर्यंत मृत्यू अथवा गंडांतर येणे, पत्रिकेत चंद्र ग्रहणयुक्त (राहू-केतूने युक्त) अथवा पाप ग्रहांनी युक्त किंवा दृष्ट असेल तर बालारिष्ट योग संभवतो. चंद्र बलहीन असता वयाच्या १२ वर्षेपर्यंत गंडांतर येण्याची शक्यता असते. जेव्हा आयुर्दायाचा विचार केला जातो त्यावेळेस प्रथम बालारिष्ट योगाचा व त्यानंतर अल्पायु, मध्यायु, दिर्घायु व पुर्णायु अशा टप्प्यात केला जातो.
No comments:
Post a Comment