१) रुचक योग - मंगळ केंद्रात उच्च अगर स्वगृही असता हा योग होतो. शरीराने मजबूत, श्रीमंत , दिर्धायु, प्राचीन विद्येत निष्णात अशी या योगाची फले आहेत. मंगळाचे बलवत्ते वर या योगाचे महत्व अवलंबून आहे. हा एक राजयोग आहे. भाव व दशवर्गात मंगळ बलहीन असल्यास किंवा दृष्टि व युतीने दुषित असल्यास खरा रुचक योग होऊ शकत नाही, तो नाममात्र असतो.
२) भद्र योग - बुध ग्रहामुळे हा योग होतो. जातक विद्वान व धनवान होतो. या योगावर पापसंबंध व अस्तंगत दोष नसावा.
३) हंस योग - पंचमहापुरूष योगापैकी हंस योगावर गुरुची सत्ता आहे. लग्न वा चंद्रापासून गुरू केंद्रात स्व अथवा उच्च राशीत असता हंस योग होतो. जातक लोकप्रिय, नीतीमान, धार्मिक असतो.
४) मालव्य योग- शुक्र ग्रह केंद्रस्थानी स्व अथवा उच्च राशीत असल्यास मालव्य योग होतो. जातक श्रीमंत , संततीयुक्त, कीर्तीवान होतो. कौटुंबिक सुबत्ता व वाहनयोग असतो.
५) शशयोग - शनि ग्रहामुळे हा योग होतो. पैसा भरपूर मिळतो पण तरीही जातकाची दुसऱ्याच्या पैशावर नजर असते.
पंचमहापुरुष योगामधील जास्तीत जास्त चार ग्रहांचे योग पत्रिकेत आढळू शकतात. जास्तीत जास्त योग असणे हे राजयोगाची फले देतात.
No comments:
Post a Comment