ग्रहांचे वक्रत्व हा वास्तविकतः एक आभास आहे. कोणताही ग्रह त्याच्या गतीने, त्याच्या कक्षेतुन सुयीभोवती भ्रमण करत असतो पण, पृथ्वीवरुन पाहणाऱ्याला , तिच्या स्वतःच्या गतीमुळे, प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या राशीविभागासमोर दिसतो. कोणताही ग्रह एका राशीत असून तो पुन्हा मागे जात आहे असे दिसले म्हणजे तो वक्र होतो व त्या ग्रहाच्या गतीला वक्र गती म्हणतात .
शुभ ग्रह वक्री असता चांगली फले देतात. पाप ग्रह वकी असता चांगली फले देत नाही. बहिर्वती ग्रह रविपासून पुढे साधारण १४० अंश गेल्यावर त्यांची गती कमी होत जाऊन तो वक्री होतो. रविच्या ६- ७ - ८ स्थानातला ग्रह नेहमी वक्र स्थितीत असतो. मंत्रेश्वराने फलदिपीकेत वक्री ग्रहाची फार प्रशंसा केली आहे. बलामध्ये त्याला उच्च ग्रहाचा दर्जा दिला आहे. सारावलीकर यांचे मते शुभ ग्रह वक्र असता बलवान होतात व राजयोगासारखी फले देतात. परंतु पापग्रह वक्री असता जास्त त्रास, भ्रमंती, दुःख व अकारण प्रवास देतात. वक्र अवस्थेत ग्रहांचे किरण तेजस्वी होतात. वक्र ग्रह बलवान असतो तो संस्मरणीय फले दोन्ही तऱ्हेने देतो व ते कुंडलीतील ग्रहाची परिस्थिती, त्याचे स्वामी व इतर ग्रहांचे दृष्टियोग ह्यावर अवलंबून आहे. पाप गह वक्र असता चांगली फले देतो पण तो नीच नसावा.
मंगळ- गुरु- शनि या ग्रहांचे वक्रत्व रविपासून पंचमात सुरु होते, ६-७-८ स्थानी ते वक्री असतात आणि नवमात ते संपते. गुरु - शनि दर वर्षी वक्र असतात. वक्रत्वानंतर स्तंभित्व हा मोठा भाग असतो. शनि वक्री व मार्गी होण्यापूर्वी ५-५ दिवस स्तंभी असतात. स्तंभत्व हा दुर्बल भाग आहे . स्तंभी काळात गोष्टी जशाच्या तशा राहतात. प्रगती होत नाही. ग्रह चांगल्या परिस्थितीत , स्वामित्वाने अगर दृष्टियोगाने शुभ असून वक्र असता अपूर्व फळे देतो.
गोचरीमधे ग्रह वक्र होऊन दुसऱ्या स्थानात गेल्यावर त्या स्थानाची फले देतो. पाश्चिमात्यांच्या मते वक्रत्व हा ग्रहाचा दोष आहे पण हिंदू ज्योतिष्यांच्या मते वक्रत्व हे ग्रहाचे बलसाधन आहे व शुभही आहे.
(संकलित) - कुंडलीची भाषा
' शास्त्री ' अभ्यासास उपयुक्त.
No comments:
Post a Comment