४) योग :-
२७ योग हे रवि व चंद्र यांच्या कुंडलीतील अंतरावर अवलंबून असतात. जेव्हा रवि व चंद्र यांच्या एकूण भोगांची बेरीज ८०० कला असते तेव्हा एक योग पूर्ण होतो. ८०० कला म्हणजेच १३°|२०' म्हणजेच दर १३ अंश २० कलानी एक योग तयार होतो. थोडक्यात रवि (आत्मा) व चंद्र (मन) आत्मा + मन यांच्या संयोगाने जीव जन्मतो असे आपण म्हणतो म्हणूनच पत्रिकेत जन्म कोणत्या योगावर झाला आहे हे महत्वाचे आहे. २७ योगांची नावे पुढीलप्रमाणे :-
१) विष्कंभ २) प्रीती ३) आयुष्मान ४) सौभाग्य ५) शोभन ६) अतिगंड ७) सुकर्मा ८) धृति ९) शूल १०) गंड ११) वृद्धि १२) धृव १३) व्याघात १४) हर्षद १५) वज्र १६) सिद्धि १७) व्यतिपात १८) वरियान १९) परिघ २०) शिव २१) सिद्ध २२) साधय २३) शुभ २४) शुक्ल २५) ब्रह्मा २६) ऐंद्र २७) वैधृति.
जन्म कुंडलीत ज्या योगावर जन्म झाला आहे त्यावरून जातकाचे स्वभाव गुणधर्म , त्याची एकंदर वागणूक आपल्याला कळु शकते. २७ योगांपैकी ९ योग ज्योतिषीय दृष्ट्या अशुभ आहेत. ते पुढीलप्रमाणे :-
१)विष्कंभ २) अतिगंड ३) शुल ४) गंड ५) व्याघात ६) वज्र ७) व्यतिपात ८) परिघ ९) वैधृति
५) करण :-
“तिथ्यर्ध करणम् ।” तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण. चंद्र १२ अंश गेल्यावर एक तिथी पूर्ण होते तर ६ अंश गेल्यावर एक करण होते. मुहूर्तशास्त्रात याचा वापर होतो. करणे २ प्रकारची असतात १) चर २) स्थिर
१) चर करणे :- १) बव २) बालव ३) कौलव ४) तैतिल. ५) गरज ६) वणिज ७) विष्टी
यातील विष्टि करण हे सर्व कार्यास वर्ज्य आहे.
२) स्थिर करणे :- कृष्ण चतुर्दशी च्या उत्तरार्धात शकुनी, अमावस्या पुर्वार्धात चतुष्पाद, उत्तरार्ध नाग करण आणि शुक्ल प्रतिपदा किंस्तुघ्न करण असे क्रमाने ही करणे येत असल्याने यांना स्थिर करणे म्हणतात. ही अशुभ करणे असल्याने शुभ कार्यास वर्ज्य आहेत.
आता पंचांगाची ५ अंगे कोणती हे आपल्याला कळलं, ते पंचांगात कसं पहायचं हे थोडक्यात बघू. खाली फोटो दिलाच आहे, त्यातील ५ जून चे पंचांग आपण वाचूया . वरिल आडव्या ओळीत संवत्सर नाम, उत्तरायण ग्रीष्मऋतु ज्येष्ठ शुक्लपक्ष अशी माहिती आहे. पहिला रकान्यात ति वा म्हणजे तिथी, वार (शुक्ल १५ म्हणजे पौर्णिमा) पुढे क मि म्हणजे कलाक (तास) मिनिटे २४।४२ ही समाप्तीची वेळ असते. रात्री १२/४२ मिनिटांनी पौर्णिमा संपून कृष्ण प्रतिपदा सुरु होईल. अनुराधा नक्षत्र १६ । ४३ म्हणजेच दु ४।४३ ला संपून पुढील ज्येष्ठा नक्षत्र सुरू होईल. याप्रमाणे पुढील योग, करण याचे रकाने वाचावेत. शेवटच्या मोठया रकान्यात त्या दिवसाची आणखी माहिती , कधी सुर्याचा नक्षत्रबदल असल्यास , काही व्रतांची माहीती असते.
टिप :- योगांविषयी अधिक माहिती माझ्या blog वरील ' शास्त्री अभ्यास ' या lable मधील माहीती वाचू शकाल.
पुढील लेखात पत्रिकेशी थेट संबंधित १२ राशी, ग्रह, भाव यांचा अभ्यास सुरु करू या.
या आधीचे लेख तसेच इतर ज्योतिषविषयक लेख वाचण्यासाठी follow करा https://pradnyaastro.blogspot.com
ज्योतिष शास्त्री प्रज्ञा तिखे
केपी अभ्यासक

No comments:
Post a Comment