तीन या अंकावर गुरू या ग्रहाचा अंमल आहे. गुरू हा सर्व ग्रहांमधील मोठा आणि खुप गुरुत्वाकर्षण असलेला शुभ ग्रह आहे. पत्रिकेत या ग्रहाचे स्थान व रास महत्वाचे ठरते कारण त्यावरून जातकाला एखादे शुभ फलित हमखास मिळणार का नाही हे ज्योतिषी ठरवतो. आता अंकशास्त्राप्रमाणे विचार करू. गुरु ग्रह ज्ञानगर्भ पांडित्य दर्शवतो. सद्विचार, नीतीमत्ता, सद्सद्विवेक बुद्धी या गोष्टी गुरुच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे अर्थातच तीन भाग्यांक असलेले लोक( ज्यांची जन्म तारीख ३,१२,२१,३० आहे.) हे उत्तम शिक्षक, मार्गदर्शक असतात. हे कोणत्याही क्षेत्रात असले तरी त्यातील पूर्ण बारकावे समजून घेण्याचा यांचा प्रयत्न असतो. कोणतेही काम वरवर करून मार्गी लावणे यांना जमत नाही. ज्ञानपिपासू असतात. कदाचित यामुळेच काही वेळा यांच्याकडून एखाद्या कामात वेळखाऊ पणा होतो, कारण यांना त्यांच्या पद्धतीने काम झाल्याशिवाय रुचतंच नाही. हे लोक काम अतिशय मनापासून करतात, पण याचा अर्थ ते कामाचा आनंद लुटतात असे मात्र म्हणता येणार नाही. ते वैयक्तिक स्वभावावर अवलंबून असेल असे मी म्हणेन. तीन भाग्यांक असलेले लोक सवयीने काम करतील. एकदा त्यांची पद्धत ठरली की ते दुसऱ्या गोष्टीत लक्ष घालतील आणि आधीचे काम handover करतील. दुसऱ्या व्यक्तीने ते यांच्यासारखे केले नाही, काही उणीव राहिली तर परत स्वतःवर ओढवून घेतील. मुळातच उत्तम मार्गदर्शक असल्याने असेल, पण यांची एखाद्याला स्वीकारण्याची वृत्ती देखील तितकीच प्रगल्भ असते. एखाद्याची पद्धत यांना स्वतःपेक्षा सरस वाटली तर ते खुल्या दिलाने स्विकार करतात. हे गुणदोष ३ आणि ३० या जन्मतारखेच्या लोकांमध्ये ठळकपणे दिसतील. १२ तारिख असलेले लोक म्हणजे रवी आणि चंद्र असे combination. या लोकांना अधिकार,आदर आणि मग प्रेम अशी अपेक्षा त्यांच्या पांडित्यपूर्ण वागण्यातून असते. तर २१ या अंकामध्ये हा क्रम बदलेल. ते लोक भावनिक पातळीवर समोरच्याला आपलंसं करतील आणि मग त्यातून आदर मिळवतील.
थोडक्यात हे लोक इतरांच्या मनात guide & philosopher अशी प्रतिमा नक्की तयार करतील आणि स्वतः एखाद्या friend च्या शोधात असतील. यांच्या ज्ञान आणि भावना यांच्या levels काही औरच असतात. या सगळ्या गोष्टींची तीव्रता पत्रिकेतल्या ग्रहांवर कमीजास्त होईल हे निश्चित. हा एक निव्वळ आणि ढोबळ आढावा.
आत्ताच्या पोस्टबद्दल ज्ञानी comment करतीलच. पुढच्या पोस्टमधे ४ भाग्यांकाचा विचार करू. नक्की भेटूया @ http://pradnyaastro.blogspot. com
5 comments:
सुंदर
धन्यवाद! 🙏🏼🙂
छान माहिती
छान माहिती
धन्यवाद!पण आपली ओळख कळली नाही.
Post a Comment