आज आपण भाग्यांक चार विषयी विचार करणार आहोत. या अंकावर 'हर्षल' या ग्रहाचे वर्चस्व आहे. या ग्रहाचा शोध १७८१ मध्ये अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ William Herschel यांनी लावला. हा ग्रह पृथ्वी पेक्षा ४ पट मोठा आहे आणि एक राशीचक्र पूर्ण करायला त्याला ८४ वर्ष लागतात म्हणून हा ग्रह प्रत्येक राशीत काय परिणाम करेल हा ज्योतिष शास्त्राचा एक अभ्यासाचा विषय आहे. पण साधारणतः या ग्रहाचे गुणधर्म मंगळ या ग्रहाशी जुळतात असे दिसून येते. मंगळापेक्षा हा थोडा extrimist आहे असंच म्हणावं लागेल. उदाहरण द्यायचे झालं तर असं म्हणू की घरात वापरली जाणारी विज (electricity) म्हणजे मंगळ असेल तर हर्षल एक power station आहे. थोडक्यात याच्याकडे जास्त शक्ती, उमेद आणि वेग आहे. एखादी गोष्ट समजून घेऊन आकलन करणे आणि तीच गोष्ट click होणे हा फरक इतर ग्रह आणि हर्षल यांच्यात आहे. हा ग्रह आधुनिकता, संशोधन तसंच विक्षिप्तपणा यांचा कारक आहे. अति हुशार व्यक्ती या कधी कधी whimsical वाटतात ना अगदी तसंच. तर ४ हा भाग्यांक असलेल्या व्यक्ती (ज्यांची जन्म तारीख ४,१३,२२ आणि ३१ आहे.) अशा हुशार, संशोधनप्रिय, काही तरी अनपेक्षित आणि 'ठासू' करण्याच्या मनोवृत्तीच्या असतात. कोणत्याही गोष्टीतले काही वेगळेपण यांच्या लगेच लक्षात येते. मग ती कपड्यांची फॅशन असो किंवा इतर काही. राहणीमान आणि टापटीप यांच्याकडे उत्तम असते, त्याकरता हे फार पैसा उधळतील असं मात्र नाही. आपण कशामुळे चारचौघात उठून दिसू हे यांच्या लक्षात येतं आणि ते त्या गोष्टी 'सहजपणे' करतात इतकंच. थोडक्यात 'गुणग्राहकता' उत्तम असते. आता तारखेनुसार विचार करायचा झाला तर ४ तारीख असलेल्या सर्वामध्ये हे गुण असतातच , १३ तारीख म्हणजे रवी आणि गुरू यांची जोडी. स्वतःकडे अधिकार घेऊन दुसऱ्याला ज्ञान देणारे, तेसुद्धा पूर्ण हुशारीने, समोरच्याची कुवत ओळखून. यामुळे हे उत्तम सल्लागार, शिक्षक होऊ शकतात. २२ तारीख म्हणजे चंद्राचे गुणधर्म तेसुद्धा दोन वेळा. मनाने जास्त विचार करणारे, कणभर घेऊन मणभर देणारे, याचा अर्थ पुर्णतः अव्यावहारिक असतात असे नाही कारण मुख्य प्रभाव हर्षल या ग्रहाचा आहे. पण एकूणच यांच्या मनातून एखादी गोष्ट सहजासहजी जात नाही तसंच यांच्यात निरीक्षण शक्ती दांडगी असते. आणि ३१ तारीख म्हणजे पुन्हा गुरू आणि रवी. समोरच्याला खूप काही सांगायचे असते यांना अगदी हक्काने.... थोडक्यात यांची स्वतः जवळ जे आहे ते दुसऱ्याला देण्याची वृत्ती असते. यांच्यातला शिक्षक जागा असतो आणि तो हर्षलच्या प्रभावाखाली असल्याने नवनिर्मितीत आणि प्रयोगशीलता दाखवतो.
एकूणच हर्षल हा ग्रह थोडं भन्नाट व्यक्तिमत्त्व दर्शवतो. काही वेगळेपण हे लोक सतत carry करतात आणि त्यात खूप सहजता असते. यांना दुसऱ्याकडून मात्र स्वतःसारख्याच सरलतेची अपेक्षा असते आणि ती पूर्ण न झाल्यास ते त्यांच्या हटके पद्धतीने react होतात. एकतर खूप चिडतील नाही तर टोकाचे नाराज होतील. अर्थात हे वैयक्तिक पत्रिकेतील ग्रहांवर अवलंबून राहील हे निश्चित. तेव्हा शेवटी एवढेच कि जन्म तारीख तुमचा स्वभाव ढोबळपणे दाखवते पण पत्रिका वृत्ती दर्शवू शकते. सध्या तरी यावरून आपल्याला पारखून स्वतः चा अंदाज बांधा आणि त्याबद्दल चे तुमचे मत नक्की comment करा.
No comments:
Post a Comment