ऑक्टोबर २०१८ चे मासिक राशिभविष्य
सदर भविष्य विचार हा रवी भ्रमणावरून केला आहे. तरी मूळ पत्रिकेतील ग्रहयोगांचा विचार फलितासाठी जास्त पुरक ठरेल. आत्ता मांडलेली फलिते ढोबळ मानाने निश्चितच सूचक ठरतील.
♈मेष :- सध्या तुमच्या राशीत येऊन बसलेला आणि तुमच्या राशीस्वामीच्या (मंगळ) गुणधर्माशी साधर्म्य असलेला हर्षल तुम्हाला वैचित्र्याबरोबरच विलक्षणपणा दाखवायची संधी देईल असं म्हणु या. मुळात तुम्ही डोक्यानी काम करणारे, तुम्हाला 'भडक डोक्याचे' असं लेबलही लावलं जातं आणि याला खतपाणी घालणारं सध्याचं ग्रहमान. पण जरा दमाने घ्या. तुमच्या धडक मारण्याच्या स्वभावामुळे विनाकारण घरातले जवळचे लोक दुखावले जात नाहीत ना याची काळजी घ्या. उद्योग-व्यवसायाच्या ठिकाणी सारं आलबेल असलं तरी नोकरवर्गाकडून काम करून घेणं हे एक आव्हान ठरू शकतं. मित्रांवर फार विसंबून राहू नका. संतातीचीआरोग्य विषयक काळजी वाटू शकते. तसंच गृहचिंता सतावेल. घरापासून लांब जाण्याचे योग आहेत. शेअर्स मधे थोडाफार फायदा होण्याची चिन्हे आहेत पण तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने गुंतवणूक करा.
♉ वृषभ :- तुमचा राशीस्वामी शुक्र हा सध्या स्वराशीत असला तरी आरोग्याची काळजी घ्यावी असेच सुचवतो आहे. मनोरंजन व काही सवयींचे वाईट परिणाम अनुभवावे लागतील. प्रतिस्पर्धी चा भाग्योदय आहे तर तुमच्या कामधंद्यातून तुम्हाला मनस्तापाला सामोरे जावे लागेल. पण तुम्ही आनंदी अशा शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करणारी मंडळी त्यामुळे एवढ्या-तेवढया वरून नाराजी तुम्ही स्वतः कडे फिरकू देणार नाही. जमेची बाजू पाहणारच तुम्ही आणि ती म्हणजे प्रेम प्रकरणात यश मिळण्याची शक्यता तसेच share market मधे देखील फायदा मिळवाल. त्यामुळे आरोग्याची वेळीच काळजी घ्या आणि आनंदी रहा.
♊ मिथुन :- कोणतीही गोष्ट खेळीमेळीत कशी घ्यावी हे तुमच्याकडून शिकावं. या महिन्यात तुमचा मनोरंजनाकडे कल असेल; पण शनि महाराज तुमच्या राशीकडे बघत असल्याने कुठे तरी अचानक मनस्तापाला किंवा जोडीदाराच्या आजारपणाला सामोरे जावे लागेल. स्वतःच्या तब्येतीचीही काळजी घ्या, मुख्यत्वे शुगर आणि मेद असलेल्या व्यक्तींनी तर नक्कीच जपा. भावंडसौख्य उत्तम राहील. उत्तरार्धात त्यांच्या अधिकारात वाढ व लाभ दिसून येतील. Share trading करताना सावध रहा अचानक काही चढउतार होण्याची शक्यता आहे. बढाईखोर मित्रांपासून लांब रहा.
♋ कर्क :- तुम्ही एकूणच कौटुंबिक वातावरणात रमणारे लोक आहात आणि या महिन्यात तुम्ही गृह सौख्याचा पुरेपूर आनंद उपभोगणार आहात मात्र व्यावहारिक बुद्धीनी वागावं लागणार आहे हे विसरू नका. उपासना चांगले मूळ धरेल. संततीसौख्य उत्तम लाभेल पण जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या तसंच मामा-मावशी यांच्या बाबतीतही काळजी वाटेल. उद्योग क्षेत्रात अधिकार मिळतील त्यांचा सुयोग्य वापर करा. याबाबत तुम्हाला औदासिन्य वाटण्याची शक्यता दाट आहे. मित्रमैत्रिणींचा उत्तम सहवास लाभेल. तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, काही जुने दुखणे उफाळून येण्याची शक्यता आहे.
♌ सिंह :- सध्या आर्थिक बाजू भक्कम असली तरी मानसिकता सांभाळा. उत्तरार्धात तुळेत प्रवेश करणारा तुमचा राशीस्वामी, तुमच्यातल्या अभिमानी वृत्तीला खतपाणी घालून काही कामांना / निर्णयांना खिळ घालू शकतो. संततीच्या तसेच जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या उद्योग व्यवसायात मात्र तेजी राहील. काही येणी बाकी असतील तर ती मात्र विलंबाने अथवा हप्त्यात मिळतील. वारसा हक्काचे वास्तूविषयक प्रश्न मार्गी लागतील.
♍ कन्या :- तुम्ही उत्तम टीकाकार आहात, आता या टीकेला गोड, प्रेमळ शब्दांची जोड द्याल. मागील महिन्यात खर्च होईल हे सांगितले होतेच, पण आता व्यवसायात उत्तम तेजी राहील. आर्थिक बाजू संपन्न राहील. मुलांच्या सुवार्ता कळतील. घरगुती बाबतीत मात्र कसलीशी चिंता वाटत राहील. जोडीदाराचे, मोठ्या भावंडांचे भाग्य उदयास येणार आहे. प्रवासात मात्र काळजी घ्या.
♎ तूळ :- तुमच्या समतोल स्वभावाला आनंदाची जोड महिन्यात मिळणार आहे. उद्योग क्षेत्रात कार्यरत असता
महत्वाकांक्षा उंचावतील. घरच्यांचा पाठिंबा मिळेल. अतिशय संयमाने वागून कर्तृत्व गाजवाल. धनस्थिती उत्तम राहील. जोडीदाराची साथ मोलाची ठरेल. तीर्थक्षेत्री प्रवास करण्याचा मानस सफल होईल. अशी सर्वांगीण प्रगती होत असताना उत्तरार्धात मित्रांच्या वागण्यात बदल जाणवण्याची शक्यता आहे. त्यांच्या सौहार्द वागण्याला गृहीत धरू नका.
♏ वृश्चिक :- परिस्थितीचा सर्वांगीण अभ्यास करून एखाद्या नाजूक प्रसंगी संधी साधून वर्मी घाव घालायचा ही तुमची खासियत. अशाच पद्धतीने पराक्रमात वाढ होत असतानाच तब्येतीच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करू नका. धनस्थिती बेताची राहील असे दिसते, निदान येणे वसूल होण्यास अपेक्षेपेक्षा जास्त विलंब होईल. पण उत्तरार्धात चित्र वेगळे असेल. संतातीसौख्य उत्तम लाभेल. शेअर्स गुंतवणूक फायद्याची ठरेल. जोडीदारावर व मित्रमंडळी वर खर्च कराल. महिन्याच्या उत्तरार्धात व्यवसाय क्षेत्रातील आपल्या अधिकारांबाबत जागरूक रहा.
♐ धनु :- साडेसाती असताना मनोधैर्य टिकवण्याचे कसब तुमच्याकडून शिकावे. तुमची मानसिकता, वैवाहिक आयुष्य आणि व्यवसाय या तीनही बाबींवर शनीची दृष्टी आहे, त्यात तुमचा राशीस्वामी गुरु हा वृश्चिक या राशीत प्रवेश करतो आहे. परिणामादाखल खर्चात वाढ होण्याची शक्यता. घरापासून लांब रहाण्याचे योग आहेत. संततीच्या बाबतीत काही अनपेक्षित निर्णय तसेच शेअर बाजारात अचानक बदल अशा गोष्टींना तोंड द्यावे लागेल. नोकरीत लाभ होतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
♑ मकर :- साडेसातीचा दुसरा टप्पा चालू असताना अनेक बाजूंनी खर्च होत राहतील तरी गुरुबदल थोडा दिलासा देईल. उद्योग व्यवसायात थोडीफार आवक चालू राहील. जोडीदार अथवा व्यावसायिक भागीदार यांची साथ मोलाची ठरेल. तेथे निर्णय घेताना सावधानता बाळगा. अधिकारांचा गैर वापर होत नाही ना याची काळजी घ्या. घरातील वातावरण थोडे वैचित्र्यपूर्ण असेल तरी तुम्ही वचक ठेवू शकाल.
♒ कुंभ :- अनेक बाजूने लाभ होतील पण संयम ठेवावा लागेल जो तुमच्याकडे उपजतच आहे. प्रत्येक गोष्टीचे नीट नियोजन करून ती अंमलात आणायची हा तुमचा गुण पण सध्या काही कारणाने अचानक काही बाबतीत पटकन निर्णय बदलत आहात असे दिसते. याचा आर्थिक दृष्टीने काही तोटा होणार नाही. उद्योग व्यवसायात तेजी राहील. लांबच्या प्रवासाचे योग आहेत. जोडीदाराकडून आर्थिक पाठिंबा मिळेल पण त्याची तंत्र सांभाळावी लागतील.
♓ मीन :- आता तुमचा राशीस्वामी गुरू वृश्चिक राशीत प्रवेश करतो आहे. तुमच्या भाग्यस्थानी येणारा हा गुरु निश्चितच उत्तम फलदायी होईल. परदेशगमन, भाग्योदय, गुरुकृपा अशा अनेक स्तरांवर सकारात्मक परिणाम दिसतील. अनेक बाजूने आर्थिक लाभ, मित्रपरिवाराची साथ मिळेल. उद्योग क्षेत्रात घोडदौड चांगली राहील. मात्र नफा आणि गुंतवणूक यांची योग्य सांगड घाला. भावंडांची चिंता वाटेल. सर्व आघाडी सांभाळताना स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला विसरू नका. जोडीदाराची उत्तम साथ राहील.

No comments:
Post a Comment