Friday, October 12, 2018

भाग्यांक पाच

भाग्यांक पाच

पाच हा क्रमांक आहे बुध या ग्रहाचा. सूर्यमालेतील सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि सर्वात लहान असा हा ग्रह. ज्योतिषीय विचार करताना बुध हा लहान मुले, अल्लड स्वभाव, बुद्धी, द्विधा मनस्थिती, खेळाचे मैदान, गणित या गोष्टी दर्शवतो. आता तुम्हाला वाटेल या अशा वेगवेगळ्या गोष्टींचा काय संबंध? तर या साऱ्या गोष्टी लहान मुलांशी निगडित आहेत. लहान मुलांकडे अचाट बुद्धीमत्ता असते. आपल्यापेक्षा त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो, पण निर्णय क्षमता मात्र कमी असल्याने द्विधा मनस्थिती असते. खेळायला आवडते म्हणून खेळाचे मैदान बुध दर्शवतो. गणित... मुलं खुप calculative असतात. इथे फक्त दोन अधिक दोन किती अशा गणिताचा विचार करून चालणार नाही. एकूणच व्यावहारिक फायदा-तोटा बुध आणि त्याच्या अमलाखाली असणाऱ्या व्यक्ती (ज्यांची जन्म तारीख ५, १४,२३ आहे) नीट समजून घेऊ शकतात. याचा अर्थ या व्यक्ती नेहमीच स्वतः चा फायदा बघतात असा नाही... ते मूळ पत्रिकेत त्यांचा बुध कसा आहे यावरून ठरेल, पण यांना या गोष्टी लक्षात येतात हे निश्चित.
आता प्रत्येक जन्म तारखेचा स्वतंत्र विचार करू. ५ ही जन्म तारीख असलेल्या लोकांमध्ये बुधाचे सर्व गुणधर्म ठळकपणे दिसून येतीलच. स्वभावाने अल्लड पण स्वतःचे नुकसान होऊ न देणारे. हे काही लोकांना अवखळ, उथळ स्वभावाचे वाटतील, विशेषतः ज्यांचा भाग्यांक ३ आहे त्यांना... पण हे पूर्णत: तसे नसतात. यांच्यात धरसोड वृत्ती असते हे मात्र नक्की. हुशार, व्यावहारिक असले तरी बेभरवशाचे वाटतात. १४ जन्म तारीख असलेले म्हणजे रवी आणि हर्षल यांचं अफलातून combination. या दोन्ही ग्रहांच्या गुणधर्मा विषयी माझ्या आधीच्या posts मधून अंदाज आला असेलच. थोडक्यात अधिकार आणि काही तरी वेगळेपण , स्वतःचा ठसा उमटवू पाहणारे हे लोक असतात. त्यासाठी माध्यम? त्यांची बुद्धी, शोधक वृत्ती, बोलण्याची शैली वगैरे. पण यांच्यात लहान मुलांना कशी स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची ओढ असते ती दिसून येते. यांच्यासमोर दुसऱ्या कोणाचे फार कौतुक झाले तर हे नाराज होतात. आणि ते स्वाभाविक आहे कारण यांच्यात कुवत असते हे नाकारून चालणार नाही. आता २३ तारखेचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की या लोकांमध्ये चंद्र आणि गुरु या ग्रहांचे गुण दोष असतात. चंद्र मनाने विचार करतो तर गुरू ज्ञानाच्या आधारे पुढे जातो. पण आधी २ हा क्रमांक म्हणजे आधी भावनेने विचार करतील, मग ज्ञानाची कास धरतील, आणि आहेत ते बुधाच्या अंमलाखाली. ज्या 'बुधाचा' अवखळपणा ज्या 'गुरूला' खुपतो, तो गुरू यांच्यातच आहे. म्हणून हे लोक स्वतःबद्दल जास्त judgemental असतात असं म्हणू या आपण. म्हणूनच हे इतरांपेक्षा स्वतःला लवकर सावरू शकतात. अर्थात पत्रिकेतील मूळ ग्रह एकमेकांशी काय योग करतात हे महत्त्वाचे आहेच.
थोडक्यात बुध ग्रहाची ही मंडळी व्यवहारकुशल, स्व -प्रतिमेविषयी सजग अशी असली तरी जबाबदारी घ्यायला थोडी बिचकणारी असतात. यांना खेळाची आवड असते, पण चिकाटी कमी असते. हुशार असले तरी ज्ञानी होण्याची तळमळ नसते. असो, हे गुणदोष लक्षात घेऊन स्वतःत बदल होण्यासाठी यांना भाग्यांक तक्त्याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. स्वतःचे अवगुण कळणे ही गुणी होण्याची पहिली पायरी आहे. ही पोस्ट वाचून पहिली पायरी चढायची इच्छा होते की नाही ते नक्की कळवा! जरूर comment करा आणि posts आवडल्यास follow करा. http://pradnyaastro.blogspot.com




4 comments:

Unknown said...

व्यवस्थित पणे खुप छान माहिती दिली आहे।

Unknown said...

व्यवस्थित पणे खुप छान माहिती दिली आहे।

Unknown said...

व्यवस्थित पणे खुप छान माहिती दिली आहे।

Pradnya said...

Thank you sir! 🙏🏼