Saturday, August 17, 2019

इच्छीत मुलीशी विवाह होईल का?

केस स्टडी ..

इच्छीत मुलीशी विवाह होईल का? 
हल्लीच्या युगात प्रेमविवाहाचे प्रमाण वाढते आहे.मुलामुलींचा मोकळा स्वभाव ,त्यांची जपली जाणारी मैत्री पाहिली की यापिढीच्या सामंजस्याचे कौतूक वाटते.पण जेव्हा लगनाचे विचार मनात घोळू लागतात तेव्हा मात्र मुलगा काय किंवा मुलगी काय नक्कीच सारासार विचार करुन निर्णय घ्यावा; कारण आयुष्याचा प्रश्न आहे , असा विचार करतात याला कारण ते एक पवित्र बंधन आहे.पत्रिकेवर विश्वास असला तरी प्रेम काही पत्रिका पाहून करता येत नाही. असच जरा मनाने मैत्रीची पायरी ओलांडल्यावर लग्नाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी एका मुलाने स्वत:चे आणि मुलीचेही पत्रिकेचे विवरण मला पाठवले. मुळातच पारंपारीक प्रमाणे बघता त्यांचे २४.५ गुण जुळत होते .तरी देखिल फक्त गुणांना प्राधान्य देण्यापेक्षा इतरही बाबी पहाणे गरजेचे ठरते.(खरे तर software मधे १६.५  गुण जुळतात. नाडीपाद वेध कोष्टकामुळे नाडी दोष रद्द होत असेल तर ते software मधे गणले जात नाही)
मुळ पत्रिका पाहतांना मुलाचा सप्तमाचा सब बुध.(धनु या द्विस्वभावि राशित)१२/६,९  न स्वामी रवि १/८ उप न स्वामी चंद्र ७ असे दर्शवतो. हा सब ५  दर्शवत नाही. ७ चा सब ५ चा कार्येश असेल तर प्रेम जमते तसेच ५ चा सब देखील ७ चा कार्येश असेल तर प्रेमाचे विवाहात रुपांतर होते.(हा मुलगा नक्कीच प्रेमात वगैरे नसावा.)पुढे मुलीची पत्रिका पाहिली. मुलीच्या सप्तमाचा सब गुरू असून ४/५,८  न स्वामी बुध ८/११,२ आणि उप न स्वामी शुक्र ७/३, १० दर्शवत होता. सप्तमाच्या सबने ५ दाखवले म्हणून मी पंचमाचा सबदेखील तपासला. तो होता शनि. शनि ७/६  न स्वामी गुरु ४/५,८  आणि उप न स्वामी केतु ९/४ दर्शवत होता. पत्रिका पाहिली तेव्हा तिची शनि - गुरु दशा २१/४/२०१९ ला समाप्त होणार होती. यावरून या मुलीचा प्रेमविवाह होईल असे वाटते. तसेच पुढील दशा बुधाची जो ८/११,२ न स्वामी केतु ९/४ उप न स्वामी राहू ३/१० दर्शवतो. दशास्वामी ३,९ ही स्थाने दर्शवत असल्यास त्यासंबंधी काही बोलणी होणे वगैरे ची शक्यता अधिक. त्यावरुन मुलाला तुझ्याशी पत्रिका जुळत नाही असे कळवले.
मुलाच्या पत्रिकेत ७ चा सब ६ , म्हणजे समोरच्या व्यक्तीची माघार असे दर्शवतो. त्यामुळे ही मुलगी नकार देईल आणि  तिचा लवकरच प्रेम विवाहाचा योग आहे हेदेखील सांगितले. नुकतेच जुलै महिन्यात मुलाने तिचा साखरपुडा तिच्या एका जुन्या मित्राबरोबर झाला असे कळवले.
ग्रह मानवी आयुष्यावर परिणाम करतातच आणि शास्त्राची प्रचिती येतेच. 

No comments: