Friday, November 15, 2019

उच्च शिक्षण




उच्च शिक्षण परदेशात होईल का?

हल्ली वेगवेगळ्या कारणांमुळे मुलांचा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा कल वाढला आहे. या करिता करावी लागणारी आर्थिक जुळवाजुळव, कागदपत्रांची जमवाजमव हे सर्व नियमाप्रमाणे करून, आपल्या मनावर दगड ठेऊन, कुटुंबीय नव्या दिशेने भरारी घेऊ पहात असतात.  अशा वेळी काही पालक “या साऱ्याचा योग्य तो उपयोग होईल ना?” “आपला पाल्य तिथे योग्य प्रकारे शिक्षण घेऊन ते पूर्ण करू शकेल ना?” याचा त्रयस्थपणे विचार करण्याची सजगता दाखवतात, यामध्ये त्यांचा आपल्या पाल्ल्यावर विश्वास नसतो असे मुळीच नाही, पण एकूणच आपण जी काही धडपड करीत आहोत, ती सार्थकी लागेल ना? हा विचार करुन पुढचं पाऊल त्यांना टाकावयाचे असते.  या अनुषंगाने एका मातेने तिच्या मुलीची पत्रिका पाठवली, त्याबद्दलचा हा अभ्यास.

मुळात या ठिकाणी दोन प्रश्नांचा अंतर्भाव आहे. एक म्हणजे – “मुलगी उच्च शिक्षित होईल ना?” आणि दुसरा ” हे शिक्षण परदेशात पूर्णत्वास जाईल ना?” म्हणजेच परदेश गमनाचा योग आहे ना?
      यात आधी मी शिक्षण योगाचा विचार केला. “केपी” मध्ये चतुर्थाचा सब  जर ४,९,११ पैकी भावाचा कार्येश असेल आणि मुख्यत्वे नवम स्थानाचा कार्येश असेल तर उच्च शिक्षण पूर्ण होते. या मुलीचा चतुर्थाचा सब रवि आहे.(सिंह लग्न व कुंभ राशीची ही पत्रिका) रवि हा कस्प कुंडलीनुसार दशम भावात चंद्राच्या नक्षत्रात व मंगळाच्या सब मधे आहे. यानुसार रवि पुढील भावांचा  कार्येश होतो. -१०|१  नक्षत्र स्वामी चंद्र ६|१२ सब मंगळ १०|४,९. म्हणजेच  उच्च शिक्षणाचा योग आहे.

परदेश गमनासाठी १२ चा सब ३,९,१२ भावांचा कार्येश होणे आवश्यक आहे, त्यानुसार या पत्रिकेत सब चंद्र, तो ६|१२ नक्षत्र स्वामी राहू ११|१२ आणि सब गुरू ९|५,८  असे दर्शवतो,म्हणजे परदेश गमनाची शक्यताही दिसते. १२ चा सब स्थिर राशींत असता मात्र प्रयत्न करावे लागतात.

संधी तर असतात पण त्यावेळेत उपलब्ध झाल्या तर त्याचा उपयोग असतो. याकरता दशविचार महत्वाचा, मुलीची गुरू महादशा दि १२|१२| ३० पर्यंत आहे. गुरू ९,५,८  नक्षत्र स्वामी रवि १०|१ सब चंद्र ६|१२ तर अंतर्दशा शनि ९|६,७, नक्षत्र स्वामी रवि १०|१ व उप नक्षत्र स्वामी मं १०|४,९ संपत आली होती. पुढील बुध महादशा देखील अनुकूलता दर्शवते. यामुळे नियमाप्रमाणे चालू दशा सोडून पुढे परदेशात उच्च शिक्षणाचा निश्चित योग आहे असे सांगितले. आॅक्टोबर महिन्यात तिने नव्या क्षितिजाकडे आत्मविश्वासाने भरारी घेतली. कसून प्रयत्न करणाऱ्याला ग्रहांची साथ असतेच !

No comments: