बीजक्षेत्र विचार -
कुंडलीमध्ये संततीसौख्याचा विचार पंचम स्थानावरून केला जातो. पण काही वेळेस पंचम स्थान बलवान असते, वरवर पाहता संतती योगही दिसतो पण संततीचा योग येत नाही. अशा वेळेस बीज व क्षेत्र विचार केला जातो. बीज म्हणजे पुरुषातील जीव धारणा करण्याची शक्ती , वीर्य तर क्षेत्र म्हणजे स्त्रीची गर्भधारणा शक्ती. पुरुष कुंडलीत शक्तीचा कारक रवि, वीर्याचा कारक शुक्र व संततीचा कारक गुरू यांचा विचार केला जातो.पुरुष कुंडलीत रवि + शुक्र + गुरु यांची राशी-अंश-कला यांची बेरिज करून जो बिंदू येतो त्यालाच बीज म्हणतात. बीज जर विषम राशीत व विषम नवमांशात असेल व शुभग्रह युक्त वा दृष्ट असेल तर बलवान असते. कुंडलीत बीज सम राशीत व विषम नवमांशात असेल अगर उलट असल्यास मध्यम बलवान असते. दोन्हीत सम राशीत असल्यास बीज दुर्बल असते.
स्त्री पत्रिकेत गर्भधारणा शक्तीचा कारक चंद्र , संततिकारक गुरु व रक्ताचा कारक मंगळ यांच्या राशी-अंश-कला यांची बेरिज करून जो बिंदू येतो त्यालाच क्षेत्र म्हणतात. ते जर सम राशीत व सम नवमांशात असेल तर गर्भधारणाशक्ती उत्तम असते. पण विषय राशीत असता निःसंतानता देतो. क्षेत्र बिंदूदेखील शुभग्रह युक्त वा दृष्ट असावा. पापग्रह मंगळ, शनि राहू, मांदी अगर नपुंसक ग्रहाजवळ नसावा. बीज व क्षेत्र वंध्या राशीत नसावे. बीज व क्षेत्र बिंदूस सप्तवर्ग बलात पापराशी जास्त मिळाल्यास प्रसवफल निष्पत्ती होत नाही.
No comments:
Post a Comment