परदेशातील कायमचे वास्तव्य :-
परदेशगमनासाठी प्रामुख्याने ३, ७, ९, १२ या स्थानांचा विचार केला जातो. ही सर्व प्रवासाची स्थाने आहेत. तृतीय स्थान देशांतर्गत प्रवास दर्शवते. नवम स्थान दुरचे प्रवास, व्यय स्थान अतिदूरचे तर सप्तम स्थान हे दशमाचे दशम स्थान असल्याने उदयोग- व्यवसायानिमित्त केल्या जाणाऱ्या प्रवासासाठी विचारात घेतले जाते. परदेशातील दीर्घकाळ वास्तव्य व नागरिकत्व यासाठी व्यय व भाग्य स्थान बलवान असायला हवे. यासाठी कारक ग्रह गुरू , राहु व चंद्र यांचा विचार प्रमुख्याने होतो. शुक्र हा ग्रह विमान प्रवासाचा कारक मानला जातो. या ग्रहांचा गोचरीने कारक स्थानांशी संबंध येतो त्यावेळी परदेशगमनाचा योग येतो. परदेशातील कायमचे वास्तव्य अथवा तेथील नागरिकत्वाचे योग असणाऱ्या पत्रिकांमधे केंद्रातील राशी व ग्रहांचा ६, ८, १२ या स्थानांशी संबंध असतो. विशेषतः चतुर्थ स्थान जे मातृभूमी दर्शवते त्याचा व्यय स्थानाशी संबंध असतो. त्यांच्या अधिपतींच्या दशाकाळात जातकाचे परदेशात कायम वास्तव्य निश्चित होण्याकडे कल असतो.
ज्योतिष शास्त्री प्रज्ञा तिखे.
स्व अभ्यास
शास्त्री परिक्षेस उपयुक्त.
No comments:
Post a Comment