नमस्कार !
‘ज्योतिष’ हा विषय अनेकांच्या जिव्हाळ्याचा असतो. कोणी ज्ञानाच्या आधारे शास्त्र म्हणून अभ्यास करेल, कोणाचा ‘निदान माझी पत्रिका मला कळली पाहीजे’ असा दृष्टिकोन असेल तर कोणीतरी मुलांचे विवाह गुणमेलन शिकून घेऊ असा विचार करत असेल. हे गूढ शास्त्र आहे त्यामुळे अनेकजण कुतूहलापोटी याकडे ओढले जातात असंही असेल. तर अशांसाठीच एक लेखमालिका लिहिण्याचा हा प्रयत्न. यात पंचांग , राशी-ग्रह- नक्षत्र-भाव याविषयी माहीती, पत्रिका कशी मांडतात, कशी वाचतात, बेसिक गणित याबद्दल step by step शिकू या. [पंचांग जवळ ठेवावे] काही वेळा गरज पडल्यास फोटो/ व्हिडिओ पोस्ट केले जातील. कोणाला यातील गणित विषयाची भीती म्हणून शिकत नसतील तर कोणी ‘काहीतरी नको ते माहीती होईल’ या विचारानी लांब रहात असतील. पण हा अभ्यास खरंच काय असतो? किती असतो? याचा अंदाज घेऊ या. आठवड्यातून दोन वार हे लेख येतील. आता You Tube च्या जमान्यात लेखमालिका कोण वाचणार असं नक्कीच वाटेल; पण आवश्यकता वाटल्यास तुम्ही हे लेख save करु शकाल . हा कोणताही अभ्यासक्रम नाही त्यामुळे परिक्षाही नाही, पण लिहीलेल्या लेखाबद्दल तुमचे प्रश्न/ शंका जरूर विचारू शकता. त्यासाठी मेसेंजर आहेच; पण “सुप्रभात/ शुभरात्री” करणाऱ्यांना ब्लाॅक केले जाईल.
माझ्या blog वर देखील हे लेख उपलब्ध असतील, तो follow करून एकत्रित लेख वाचता येतील. Blog Link - https://pradnyaastro.blogspot.com
ही पोस्टदेखील अर्थातच नावासकट शेअर करु शकता.
ज्योतिषशास्त्री प्रज्ञा तिखे.
केपी अभ्यासक
No comments:
Post a Comment