लेखमालिका ५
मागील लेखात आपण १२ ग्रह , त्यांचे स्वामी कोणते?, राहू-केतु याबद्दल थोडी माहिती घेतली. आपणबघितले की पत्रिकेत १२ भाग असतात ते स्थिर आहेत , त्यात येणारे ग्रह आणि राशीमुळे प्रत्येक पत्रिका ही वेगळे भाकीत वर्तवणारी असते. हे (भाग ) भाव स्थिर म्हणजे काय; तर प्रत्येक पत्रिकेतील एखाद्या स्थानावरून ज्या गोष्टि पाहिल्या जातात त्या सरसकट सारख्या असतात, उदाहरणार्थ प्रत्येकच पत्रिकेतील प्रथम स्थानावरून त्या व्यक्तीच्या शारिरीक ठेवणीबद्दल आडाखा बांधला जातो, पंचम स्थानावरून प्रथम संततीचा विचार होतो किंवा जोड़ीदाराविषयी विचार करताना सप्तम स्थान बघतो वगैरे. नेमके कोणत्या स्थानावरून कशाकशाचा विचार होतो हे आता आपण पाहूया. त्या आधी खालील फोटोत पत्रिकेमधे हे भाव कशा क्रमाने येतात (anti clockwise) ते बघून घ्या.
मागील लेखात आपण १२ ग्रह , त्यांचे स्वामी कोणते?, राहू-केतु याबद्दल थोडी माहिती घेतली. आपणबघितले की पत्रिकेत १२ भाग असतात ते स्थिर आहेत , त्यात येणारे ग्रह आणि राशीमुळे प्रत्येक पत्रिका ही वेगळे भाकीत वर्तवणारी असते. हे (भाग ) भाव स्थिर म्हणजे काय; तर प्रत्येक पत्रिकेतील एखाद्या स्थानावरून ज्या गोष्टि पाहिल्या जातात त्या सरसकट सारख्या असतात, उदाहरणार्थ प्रत्येकच पत्रिकेतील प्रथम स्थानावरून त्या व्यक्तीच्या शारिरीक ठेवणीबद्दल आडाखा बांधला जातो, पंचम स्थानावरून प्रथम संततीचा विचार होतो किंवा जोड़ीदाराविषयी विचार करताना सप्तम स्थान बघतो वगैरे. नेमके कोणत्या स्थानावरून कशाकशाचा विचार होतो हे आता आपण पाहूया. त्या आधी खालील फोटोत पत्रिकेमधे हे भाव कशा क्रमाने येतात (anti clockwise) ते बघून घ्या.
इथे जे आकडे लिहिले आहेत ते भावांचे ( स्थानांचे) आहेत, राशींचे नाहीत हे लक्षात ठेवा. तुमच्या पत्रिकेत यापेक्षा कदाचित वेगळा क्रम तुम्हाला दिसेल; कारण त्यात राशींचे क्रमांक लिहिले आहेत जे आपण मागील लेखात पहिले. आता प्रत्येक भावावरून काय पाहतात हे बघूया.
१) प्रथम भाव :- याला ' लग्न' भाव म्हणतात. कोणत्याही घटनांचा विचार करताना हा भाव विचारात घेतात. या भावावरुन जातकाची वैचारीक / बौद्धिक पातळी, स्वभाव गुणदोष, मनाचा कल, आरोग्य, आयुर्दाय, चरित्र, नेतृत्व, प्रयत्नातील यशापयश, दुसऱ्यावर पडणारी छाप पाहीली जाते.
२) द्वितीय भाव :- द्वितीय स्थानावरुन डोळे, त्यांचे सौंदर्य/ दोष, तोंड- दात (म्हणून) खाण्यापिण्याची आवड पाहतात. वाणीचे स्थान असल्याने विचार प्रकट करण्याची क्षमता, आवाजातील माधुर्य / जरब, बोलण्याची पद्धत, गायन विद्या, वाचा-दोष, वक्तृत्व, (बोलण्याच्या कलेशी निगडीत व्यवसाय म्हणून) विक्रेते यांचा विचार होतो. कुटुंबस्थान असल्याने कौटुंबिक सौख्य, धनस्थान असल्याने स्वकष्टार्जित धन , किमती वस्तु, ज्यांचे रोख पैशात सहज रूपांतर करता येते अशा वस्तु, आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था यांचा विचार होतो.
द्वितीय विवाहाचा विचार या स्थानावरून होतो. पोशाख, निरीक्षण दृष्टि , स्मरणशक्ती व कल्पनाशक्तीचाही विचार होतो.
३) तृतीय भाव :- कुंडलीतील या स्थानावरून जास्तीत जास्त बाबी पाहिल्या जातात. तृतीय स्थानावरून धैर्य- भित्रेपणा, मानसिक बैठक, आशा- निराशावाद, विशिष्ठ विषयाचा बौद्धिक कल, छोटे प्रवास, वास्तु बदलणे, नोकरीत बदली वगैरे. कोणतेही agreements, छापील / लिखित मजकूर, पत्रलेखन ते साहित्यलेखन सर्व प्रकार, मुलाखती, जामिन राहणे, लेखन साहित्य, प्रसिद्धि माध्यमे ( audio / video / printed) सर्व. All transport and communication medias. वरील सर्व बाबींसंबंधी वस्तू तसेच नोकरी वा व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था, भाषातज्ञ, भाषांतरकार वगैरे या भावावरुन बघतात. शेजारी व त्यांचे सौख्य/ त्रास, लहान भावंडांपासून मिळणारे सुख-दु:ख या स्थानावरुन कळते.
४) चतुर्थ भाव :- यावरून आई, शिक्षण, घर, वाहन, जमिन, जागा, शेती यांचा विचार होतो. शिक्षण (प्राथमिक) त्याचा दर्जा वगैरे. सुखस्थान म्हटले जात असल्याने सर्व प्रकारची सुखसोयीची साधने उदा. फ्रिज, AC, mixer etc. वाहनौख्य, वाहनविषयक व्यवसाय, शेती व तत्संबंधी व्यवसाय, सर्व द्रव पदार्थ, पाण्याचे साठे हे पाहीले जाते. आयुष्यातील उत्तरार्ध हे स्थान दर्शवते.
५) पंचम भाव :- संतती संबंधित सर्व काही. सर्व प्रकारच्या कला, गायन- वादन, करमणूक साधने (नाटक/ चित्रपट इ.) त्यातील कलाकार व त्या संबंधित सर्व साहीत्य. कला व्यवसाय म्हणून स्विकारणे वगैरे.
प्रेमप्रकरणासंबंधी सर्व काही जसे प्रेमाचे स्वरूप, यशापयश, फसवणूक, विवाहबाह्य संबंध वगैरे. मैदानी खेळ व त्याचे साहित्य. फुलझाडे, नर्सरी, वैद्यकशास्त्र. पुर्व जन्माचे सुकृत, आध्यात्मिक साधना, शिष्य व लहान मुले, पाळणाघरे या साऱ्याशी निगडीत स्थाने व व्यवसाय. आरोग्याच्या दृष्टिने चांगले स्थान आहे.
६) षष्ठ स्थान :- हे सर्वात उच्च दर्जाचे धनस्थान आहे. Bank balance, नोकरी, पगार, नोकरीचा कालावधी, व्यवहारातून मिळणारा लाभ, कर्ज, overdraft facility, उसने दिलेले पैसे मिळणे, परदेशाकइून कर्ज मिळणे इ., निवडणूका, Court cases, शर्यतीत विजय, स्पर्धा परिक्षेतील यश- अपयश, आजार- त्याचे स्वरूप, कालावधी, त्यामुळे येणारे व्यंग, साथीचे रोग, कामगार/ नोकर वर्ग, त्यांच्याकडून होणारे लाभ- हानी, कामगार संघटना, त्यांचे संप. शत्रु- त्याची ताकद. पाळीव प्राणी, त्यांच्याशी संबंधित जागा इ.
Pathology labs, catering-hotel/mess service etc., सफाई खाते याही गोष्टिंचा विचार या स्थानावरून होतो. पष्ठेश बलवान असल्यास एकच व्यवसाय पिढीजात असतो. हे मातुल घराण्याचे स्थान आहे त्यामुळे मामा मावशी यांचेकडून मिळणारे सुख इथून पाहतात.
पुढील लेखात आपण पुढील ६ भावांविषयी जाणून घेऊ.
No comments:
Post a Comment