लेखमालिका ६
मागील लेखात आपण पत्रिकेतील प्रथम ते षष्ठ भावांवरून काय पाहतात ते बघितले. आता पुढील भावांचा विचार करू
७) सप्तम भाव :- हे कायदेशीररीत्या बंधनाचे स्थान आहे. त्यामुळे life partner, business partner , ज्यांच्याशी कायदेशीर वाद होतात त्या व्यक्ती म्हणून चोर/ कोर्टकज्जे यातील दावेदार तसेच नोकरी करतो ती संस्था/ मालक या गोष्टि पाहिल्या जातात. विवाहासंबंधी सर्व गोष्टि, जोडीदाराचा स्वभाव ; वयातील अंतर वगैरे. व्यापार व व्यवसायास पूरक स्थान आहे. भागीदार- त्याचा स्वभाव, भागीदारीचा कालखंड. षष्ठ व सप्तम भावाची सामाईक दशा असते (पुढील लेखांमधे दशा म्हणजे काय ते समजेल) तेव्हा Court casesचे प्रसंग येतात.
खंडीत प्रवास, द्वितीय संतती, गुप्तशत्रुचे भय , आजार व मृत्युसंदर्भात देखील हा भाव विचारात घेतला जातो (कारण याला मारक स्थान असे म्हणतात.)
८) अष्टम भाव :- सर्वात जास्त अशुभ व नुकसानकारक स्थान. सर्व प्रकारचे नुकसान, तोटे भरून न येणारी हानी, आर्थिक नुकसान, मुख्य विरोध, बदनामी, खोटे आरोप, तळतळाट लागणे इ.
आजार, आयुष्य मर्यादा, अपमृत्यू, आत्महत्या, अवयव निकामी होणे, भाजणे, गर्भपात, खून, हल्ला , बलात्कार यांचा विचार.
या भावातून जरी धन मिळत असले तरी त्यासाठी काहीतरी गमवावे लागते. पूर्वजांचे धन, बेवारशी धन, मृत्युपत्राद्वारे- दत्तक गेल्याने मिळणारे धन, विमा, हुंडा, स्त्रीधन, लाचलूचपत , खंडणी याद्वारे मिळणारे धन.
Surgeons, engineers, auditors, विषारी पदार्थ-प्राणी, त्यापासून औषधे बनवणारी संस्था/ कर्मचारी, शस्त्रक्रियेची हत्यारे, दारुगोळा, बंदुका, काळी विद्या - Insurance agents/companies, Fire brigade, कत्तलखाने, न्हावी, खाटिक.
स्मशान- तेथील कर्मचारी, जन्ममृत्यू नोंदणी कार्यालय, मृत्युचे कारण व त्यावेळची परिस्थिती.
९) नवम स्थान :- सर्व धर्मीय धर्मस्थळे, न्यायालये, तेथील कर्मचारी व त्यासंबंधित लोकं i.e. lawyers, solicitors etc. Trusts चा विचार होतो. दूरचे, परदेश प्रवास, PhD सारखे उच्चशिक्षण, प्राचार्य, कुलगुरू इ.
पूर्वपुण्याई, मोठे धर्मग्रंथ, आध्यात्मिक संस्था, ज्योतिषशास्त्र, साक्षात्कार, ग्रंथ प्रकाशन, आकस्मिक मिळणारी मदत वगैरे. पितृसौख्य ( In KP) अनोळखी/ परदेशी व्यक्ती, मोठया जाहिराती, दूर प्रवासी संस्था Air Travel Co. सरकारमधील बदल यांचा विचार होतो.
१०) दशम स्थान :- कर्मस्थान. जातक नोकरी करेल की धंदा याचा बोध या स्थानावरून होतो. नोकरीचे क्षेत्र, पदोन्नती/ पदावनती, निलंबन, बदली, उद्योग-धंदयातील यशापयश, कोणत्या प्रकारचा व्यवसाय करावा इ., Name & fem, manager, IAS/IPS Officers, सरकारी कर्मचारी, राष्ट्रपती- पंतप्रधान, मंत्री, खासदार, नगरसेवक, राजकारण, स्थावर मिळकत यांचा विचार होतो.
** जातक कोणत्या प्रकारचा व्यवसाय/ नोकरी करेलयासाठी दशम भावाबरोबरच द्वितीय भाव ( स्वकष्टार्जित कमाई) , षष्ठभाव ( दैनिक कष्ट) याचा एकत्रित विचार करावा.
११) एकादश स्थान :- यालाच लाभ स्थान असेही म्हणतात. जातकाच्या सर्व इच्छापूर्तीचे स्थान. सर्व प्रकारची आवक, पुनर्मिलन, निवडणुकीतील यश, संततीशी पटणे याचा विचार होतो.
मोठे भावंड, मित्र परिवार, दूर गेलेली व्यक्ती परत येणे, तुरुंगातून सुटका होणे, हॉस्पिटलमधून घरी येणे या गोष्टि पाहिल्या जातात. हे षष्ठाचे षष्ठ स्थान आहे त्यामुळे एखादया आजाराचा प्रादूर्भाव होणेदेखील लाभेशाच्या दशा-अंतर्दशेत दिसून येते. तसेच चतुर्थाचे अष्टम स्थान असल्याने मातेचा वियोग दर्शवते.
१२) द्वादश स्थान :- याला व्यय स्थान असे म्हणतात. मोक्ष, त्याग, एकांत/अज्ञातवास, विरक्ती, परदेश-लांबचे प्रवास, परदेशी संस्था व दूतावास यांचा विचार होतो. हे स्थान जातकाचा पराभव दाखवते. सर्व प्रकारचे खर्च/ दानधर्म, गुंतवणूक व त्यामुळे होणारा खर्च , जातकाची खर्चिक वृत्ती, दिवाळखोरी, हाॅस्पिटल व तेथील वास्तव्य हे दिसते. हा भाव डाॅक्टरांना लाभदायी व पोषक आहे.
तुरुंगवास, फसवणूक, गुप्तसंस्था, गूढविद्या, जादूटोणा, पिशाच्चबाधा, आत्मविश्वासाचा अभाव, मृत्यु- स्मशान, जंगले, वन्य श्वापदे, ढोंगी व्यक्ती, निद्राभंग, पादत्राणे यांचा विचार या भावावरून होतो.
अशारितीने आपण कोणत्या भावावरून काय काय पाहिले जाते ते बघितले. पत्रिका पाहताना कशासंबंधी बघतो आहोत त्या अनुषंगाने या भावांचा तर्क बुद्धिने विचार करायचा , भावेश काय सांगतो ( म्हणजे त्या भावात येणाऱ्या राशीचा स्वामी. पुढे विस्ताराने बघू) चालू महादशा- अंतर्दशा कोणत्या आहेत (या दशा पत्रिकेत दिलेल्या असतात. आपण त्या कशा काढल्या जातात हे पण पाहणार आहोत.) गोचर ग्रह ( म्हणजे आत्ता चालू ग्रह कोणत्या राशीत/भावात आहेत ते) या सगळ्याचा विचार करून फलादेश वर्तवला जातो. हे सगळे सवयीने आणि अनुभवाने पटापट जमू लागते.
पुढील पोस्ट मधे ग्रहांचा विचार करूया.
ज्योतिष शास्त्री प्रज्ञा तिखे.

No comments:
Post a Comment