मृत्यूयोग
कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या आजाराची दहशत अजूनही पूर्ती सरलेली नाही पण हळूहळू सगळं पूर्ववत होत आलंय . ज्यांच्या जिवलगांना याचा फटका बसला त्यांना मात्र याचा सल बोचत राहील. दि 20/08/2020 ला माझ्या मैत्रिणीचा फोन आला की तिच्या वडिलांना थोडा ताप आला असून हॉस्पिटलमध्ये नेत आहे पण कुठे admit करून घेत नाहीत; म्हणाली "पहिल्यांदाच या कोरोनाची भीती वाटत आहे. बाबा बरे होतील ना?" मी तिला थोडा धीर देऊन योग्य त्या गोष्टी करण्यावर भर दयायला सांगितलं आणि काही वेळाने वेळेची कुंडली मांडली. काकांशी माझाही चांगलाच परिचय होता. त्यांचे वृषभ लग्न आणि मूळ नक्षत्रातला चंद्र अष्टमात आहे एवढंच लक्षात होतं. पत्रिकेचा विचार पुढीलप्रमाणे. :-
20/08/2020. 11:32. तूळ लग्न
लग्नाचा सब शुक्र 9/8,1 -राहू (मिथुन) 8/9,12 -रवि 10/11
शुक्र सब पातळीवर 11 दर्शवत होता. सबचा न स्वामी केतू कस्पमध्ये 2 या मारक स्थानात असून त्याचा राशिस्वामी गुरु वक्री होता. एकंदर परिस्थिती अवघड होती. चंद्र त्यावेळी शुक्राच्या पूर्वाफाल्गुनी म्हणजेच काकांच्या ' संपत' नक्षत्रात होता. एकूण पत्रिकेतील ग्रहस्थिती पाहून मी चंद्राच्या नक्षत्र भ्रमणावर लक्ष दिले. मूळ जन्मनक्षत्र असता रवी, मंगळ व गुरुची नक्षत्रे अनुक्रमे विपत, प्रत्यर व वध नक्षत्रे येतात(नक्षत्र गोचर) जन्मनक्षत्रदेखील फार शुभ मानले जात नाही. तसेच मूळ नक्षत्र मूळ पदावर आणते असा विचार मनात आला आणि त्या नक्षत्रावरच हे पुन्हा मूळ स्वरूपात , अनंतात असतील असे वाटले. त्यावरून तारीख काढली आणि यांच्यासाठी 29-30 ऑगस्ट हे दिवस अवघड असतील असे वाटले. दि 29/08/2020 रोजी पहाटे 1:00 वा. वामन जयंती व परिवर्तिनी एकादशी या तिथीला हि निस्पृह व्यक्ती परलोकात परावर्तित झाली असे कळले.
No comments:
Post a Comment