# CASE STUDY
घटस्फोट कधी होईल?
एका स्त्रीने हा प्रश्न विचारून तिचे birth details पाठवले होते. आधी पत्रिकेत घटस्फोटाचे योग आहेत का ते बघू.
7 चा सब बुध (मिथुन) 11/3 न स्वामी गुरु (वृषभ) 10/5,9 सब चंद्र 8/12
म्हणजेच बुध 2,11आणि 8 चा सुद्धा कार्येश आहे. एकापेक्षा जास्त विवाहाचे योग आहेत. 7 चा सब 3 चा कार्येश होत असेल तर legal divorce होतो, तो नियमदेखील लागू होतो.
दशा शुक्र 16/10/2031 पर्यंत . शुक्र 10 न स्वामी रवी 11/1,2 सब केतू 8/9,5 नवम भावाच्या दशा - अंतर्दशा मध्ये डिवोर्स चा निकाल लागतो. त्याचे कार्येश ग्रह पाहू.
9} गुरु, राहू, मंगळ , बुध , रवी / आणि शनीची दृष्टी आहे.
निकाल कधी लागेल ? हे मी दि 4/10/2019 16:14 ला पाहिले त्यावेळेचे L शनी S केतू(गुरु) R गुरु D शुक्र L* राहू
चालू दशा शुक्र-राहू-गुरु 22/10/19 पर्यंत. पुढे शनी प्रत्यंतर 12/4/2020 शनी रुलिंग मध्ये आहे, यावरून निकालाला वेळ लागेल. पुढे बुध रुलिंग मध्ये नाही म्हणून त्या दशेचा विचार सोडला. केतू दशा 14/9/20-17/11/20 या कालावधीत आहे. केतू रुलिंग मधेपण आहे. त्याचे कार्येशत्व:-
केतू 8/5,9 न स्वामी बुध 11/3 सब गुरु 10/5,9
केतू 3,9,11 या महत्वाच्या भावांचा कार्येश होतो आहे यावरून हा कालावधी सांगितला. प्रश्न पाहिला त्यापासून हा कालावधी बराच पुढचा होता. यामुळे त्या बाईंना साशंकता होतीच , पण त्यांच्या काही वैयक्तिक तर कधी सरकारी कारणांमुळे तारीख पे तारीख पडत अखेर 20 सप्टेंबर 2020 दरम्यान काडीमोड कायदेशीररित्या पार पडला.
आता द्वितीय विवाहाच्या भाकिताबद्दल wait and watch धोरण आहे.
No comments:
Post a Comment