Wednesday, February 10, 2021

नवीन घर कधी होईल?



 #CASESTUDY 

नवीन घर कधी होईल? 

या प्रश्नाकरिता  मी माझ्या सोयीने अशी वेळेची कुंडली मांडली. 

दि 3/01/2020 वेळ 20:57 कर्क लग्न 

L चंद्र  S बुध  R गुरु D शुक्र L* बुध 

आधी घराचा योग आहे का बघू . 

4 चा सब 4,11,12 चा कार्येश असून तो मंगळाशी संबंधित असेल तर वास्तू होते, प्रश्न कुंडलीत सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नको. 

4 चा सब शुक्र 6/4,11 न स्वामी व उप न स्वामी दोन्ही मं 4/5,10 (मार्गी)

4{ शुक्र, मं , रवी, बुध , केतू

11{ राहू, रवी, बुध , केतू, शुक्र

12{ चंद्र, बुध 

चालू दशा बुध , तो 4,11 चा कार्येश असून रुलिंग मधे आहे. हे रहाते घर विकून नवीन घर घेणार , त्यामुळे दशा विचारात 3,5,10 पण असणे आवश्यक आहे. 

बुध 5/3,12 न आणि उप न स्वामी शुक्र 6/4,11 म्हणून बुध दशेत घर होणार हे नक्की. अंतर्दशा मंगळाची 4/10/2020 पर्यंत. मंगळ रुलिंग मध्ये नाही पण 4/5,10 - शनी 6/7,8 - बुध 5/3,12 असा कार्येश घराच्या बाबतीत त्याला महत्व आहे, तसेच पुढील राहू अंतर्दशा त्यादृष्टीने पूरक नाही असा विचार करून मंगळाच्याच दशेत काम होईल असा निर्णय घेतला. रुलिंग मध्ये 2 वेळा येणारा बुध काहीतरी गडबड करणार असे वाटत होते , पण "ऑक्टोबर अखेर पर्यंत काम होईल" यावर जातकाचे समाधान झाले. सब शुक्र असल्याने उत्तम सुविधांनी युक्त असे ठिकाण असेल असे सांगितल्यावर अजूनच खुश झाले. त्याप्रमाणे झाले देखील. आता बुधाने काय केले बघू. यांच्या घराचा विक्री व्यवहार बुध -मं -रवी या कालावधीत पूर्ण झाला. नवीन घरात resale चा असूनही काही काम काढले होते त्यामुळे मधला एक ते दीड महिना ते ओळखीच्या एकांकडे भाड्याने राहिले आणि ऑक्टोबर अखेर स्वतःच्या घरात प्रवेश केला. नवीन घर मिळाले ती सोसायटी Gym , Play area अशा सोयी असलेली आहे. 

माझे मात्र उगाचच कौतुक झाले. 

2 comments:

psychichealersharma said...

Great post. Thanks for sharing with us. Also get in touch with Astrologer Sharma Ji, a renowned astrologer serving clients all over Canada. Astrologer in Toronto | Top Astrologer in Toronto | Psychic in Toronto | Psychic Reader in Toronto | Palm Reader in Toronto

Pradnya said...

Thank you sir!