Thursday, December 16, 2021

रत्न कोणते वापरू ?

रत्न कोणते वापरू?


ज्योतिष शास्त्राचा अभ्यास झाला की हे असे प्रश्न आपल्याला सर्रास विचारले जातात. आपण कुंडली/ पत्रिका पाहून भविष्यकथन करतो, त्यात वास्तुशास्त्र, रत्नशास्त्र, तांत्रिक उपाय यांचा विस्तृत अभ्यास नसतो. त्या गोष्टी सखोलपणे वेगळ्या शिकाव्या आणि अभ्यासाव्या लागतात याची अनेकांना जाणीव नसते. कोणी भाबड्या विश्वासाने तर कोणी खोचकपणे त्याबाबत प्रश्न विचारतात. माझा रत्नशास्त्राचा अभ्यास नाही हे कबूल करूनही समोरचा जातक जेव्हा त्याला अमुक रत्न वापरण्यास सांगितले आहे असे सांगतो आणि ते ६-८-१२ स्थानाशी निगडीत ग्रहाचे असते तेव्हा मात्र मला सांगणाऱ्याची कमाल वाटते. 
आपल्यातले दोष कमी करण्यापेक्षा गुणांची वाढ करण्याकडे आधी लक्ष द्यावे असे माझे मत आहे. जसे एखादी रेषा लहान करायची तर तिच्या शेजारी दुसरी मोठी रेष काढणे हा उपाय रास्त होतो तसेच गुणवर्धन झाल्याने दोषांचे उच्चाटनसुद्धा योग्य प्रकारे होते. हाच प्रकार पत्रिकेत लागू करावा.. ...
उत्तम ग्रह किंवा पत्रिकेतील लग्नेश, व कोनस्थानाचे स्वामी सुस्थितीत असतील तर त्यांच्या रत्नाला अग्रक्रम द्यावा (त्या ग्रहांचे दुसऱ्या राशीचे स्थान विचारात घेऊन) त्यानंतर दशमेशाचा विचार बघावा तसेच जातकाची नेमकी काय समस्या आहे , दशा व गोचर काय दर्शवते आहे हेदेखील पाहणे तितकेच महत्वाचे. 
पुष्कराज हे रत्न काही हानी करत नाही, ते सगळ्यांना चालते हा एक गैरसमज फार रुढ होतो आहे. 
हे सारे पाहून पुन्हा कोणतेही रत्न हे आयुष्यभरासाठी उत्तम फलदायी नसते. याकरता रत्न वापरूच नये असे मात्र नाही , योग्यवेळी योग्य प्रयत्नाने नक्कीच फायदा घ्यावा. त्याबरोबरच त्याच्या मर्यादा आणि नियमसुध्दा जातकापर्यंत पोचले पाहिजेत. जमल्यास जातकाला उपासनेस उद्युक्त करावे. 
उपासनेचा प्रसार करणे ही  भगवत्सेवाच आहे. 

©️ज्योतिष शास्त्री प्रज्ञा तिखे
स्व अभ्यास

No comments: