Wednesday, March 1, 2023

राशि भविष्य - मार्च 2023

राशिभविष्य - मार्च 2023

शोभन नाम संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा ! 

शुभदिन - 1,4,5,8,9,11,18, 22,23,27, 30,31

पौर्णिमा - 6 मार्च , अमावस्या - 21 मार्च 

मेष - अति व्यावहारिकता नको. - व्यवसायात नवनवीन कल्पना सुचतीललाभातील ग्रहस्थितीमुळेउत्तरार्धात या कल्पना अंमलात आणण्यासाठी योजना आखल्या जातीलएकतर्फी संवादामुळेभावंडसौख्यात काही अंशी न्यूनता येण्याची शक्यतातुमच्या न्याय्य वागणुकीच्या आग्रहामुळेवैवाहिक आयुष्यात तणावाचे प्रसंग येण्याची शक्यताउत्तरार्धात हि स्थिती निवळेलपण वेळीचजोडीदाराच्या गरजांना महत्व द्यासंततीशी संवाद विचारपूर्वक करावाअति व्यावहारिक बोलणेत्यांच्या दृष्टीने त्रासदायककेलेल्या कामांचा आता परतावा काही अंशी मिळायला सुरुवात होईलशेअर बाजारात नुकसानीचे योगअमावस्येचा कालावधी त्रासदायकमन शांत ठेवण्याचा प्रयत्नकरावा

वृषभ - कसोटीचा त्रासदायक. - कर्मस्थानातील शनि कामातील व्यग्रता वाढवणाराहा महिनावेगवेगळ्या माध्यमातून पैसा खर्च करणारा आहेजोडीदारावर वैद्यकीय खर्च होण्याची शक्यता जास्तउत्तरार्धात राशीस्वामी शुक्र पापग्रहांच्या कात्रीत सापडतो आहेतरीदेखील आपली आनंदी वृत्ती ढळू देण्यात यशस्वी रहालअमावस्या जमाखर्चाचा ताळमेळ  लागू देणारी असेलहा महिना आपल्याकसोटीचा आहेगुरु महाराज तारून नेतील हा विश्वास बाळगाआपली संयमी तसेच लढाऊ वृत्तीपरिस्थिती डळमळीत होऊ देणार नाहीआपली उपासना आपल्याला अलिप्त ठेऊन योग्य कर्म करूनघेईलत्यामुळे शरणागत भाव ठेवा.

मिथुन - अवास्तव अपेक्षा नको. - राशिस्वामीचे भाग्यस्थानातून भ्रमण होते आहेआवर्जून उपासनेलामहत्व दिलेत तर अधिक फायद्याचे निश्चित असेलपण फिरतीची कामे तसेच कुटुंबीयांची योग्य साथ मिळाल्याने याला प्राधान्य दिले जाणार नाही असे दिसतेपूर्वार्धात प्रियजनांसोबत वेळ घालवालभाग्यस्थानातील शनि महाराजांशी युती काही कालावधीसाठी अलिप्त आणि कर्मप्रधान बनवेलवाहनसौख्य उत्तमअमावस्या व्यस्ततेचीउत्तरार्ध प्रेमप्रकरणात अनपेक्षित घडामोडी करणाराअवास्तव लाभांची अपेक्षा ठेऊ नकापौर्णिमेदरम्यान प्रवास घडेलमंगळाची स्थिती वैद्यकीयउपचारांवर खर्च दर्शवते तसेच चोरीपासून दक्षता बाळगण्याचे सुचवते आहे

कर्क - कार्यप्रवण रहाललाभातील मार्गस्थ मंगळ आपल्या कामांचा योग्य मोबदला देण्यास संततीस आनंद देण्यास सज्ज आहेअष्टमस्थ शनि मानसिक स्तरावर त्रासदायक असला तरी गुरुमहाराजांची दृष्टी तारून नेईलकर्मस्थानातील ग्रह सतत कार्यप्रवण ठेवतीलरविची स्थिती अधिकारीवृत्तीने  बोलण्याचे सुचवते आहेपौर्णिमेदरम्यान तीर्थक्षेत्री प्रवासाची संधीवाहनसौख्य उत्तम राहीलपूर्वार्धात अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यताआवर्जून कुलदेवीची उपासना करावीफलदायी ठरेल

सिंह - मोबदला मिळेल. - ग्रहांच्या स्थानमहात्म्याचा फायदा मिळेल. भाग्य- कर्म- लाभ यांच्या संयोगातून केलेल्या कामांचा मोबदला नक्की मिळेल यावर विश्वास ठेऊन कार्यरत रहा. राशीतच होणारी पौर्णिमा आनंददायी असली तरी खर्च किती झाला असा विचार करायला लावेल. शनिमहाराजांची स्थिती आनंद साजरा करू देण्यावर थोडा चाप बसवते आहे. पण चिंता नसावी. गुरुमहाराजांची स्थिती लवकरच साथ द्यायला उभी असेल. पूर्वार्धात कामानिमित्त प्रवास तापदायक असू शकेल. अष्टमात होणारी अमावस्या अनपेक्षित खर्च आणि विचित्र मनोवस्थेची राहील. गणेश उपासना लाभदायी ठरेल.

कन्या - मन चिंती ते वैरी न चिंती . - पूर्वार्धातील रविची स्थिती आर्थिकदृष्ट्या लाभदायी असेल. आरोग्य व जोडीदाराचे सौख्य उत्तम राहील. अष्टमस्थ ग्रहस्थिती मात्र 'मन चिंती ते वैरी न चिंती' असे करून मनःस्थिती बिघडवून ठेवेल. शेअर बाजारात थोडाफार नफा मिळण्याची चिन्हे. उत्तरार्धात राशिस्वामी बुधाची गुरु महाराजांशी युती होत आहे. उपासनेच्या दृष्टीने योग्य तो लाभ मिळवण्याचा प्रयत्न करावा. कामाच्या ठिकाणी मात्र गोंधळलेली अवस्था होण्याची शक्यता आहे. अमावास्येदरम्यान त्यामुळे आर्थिक गणित बिघडू शकते. 

तूळ - जुळवून घ्यावे लागेल. - संततीसौख्य उत्तम राहील. विविध लाभ होतील. पण उत्तरार्धात मात्र गाफील राहून चालणार नाही. रोग स्थानात होणारी अमावस्या आर्थिकदृष्ट्या लाभदायी असली तरी शारीरिकदृष्ट्या कष्टदायक असू शकेल. प्रवास किंवा वैद्यकीय खर्च उद्भवू शकतो. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. शेअर व्यवहारात जैसे थे परिस्थिती राहील. पौर्णिमा केलेल्या कामाचे समाधान देईल. आर्थिक मोबदला मात्र अपेक्षेपेक्षा कमी राहील. उत्तरार्धात जोडीदाराची मर्जी सांभाळताना स्वतःचे प्राधान्य कमी होत आहे असे वाटेल. 

वृश्चिक - सतर्क रहा. - प्रेमप्रकरणात यश अनुभवाल. काही जुन्या कुरबुरी मिटवण्यात यशस्वी व्हाल. पौर्णिमेदरम्यान वाढत्या जबाबदारीतही आनंद मानाल. कुटुंबाची साथ मिळेल. शेअर्स व्यवहारात थोडाफार फायदा होण्याची संधी आहे. करमणुकीकडे कल राहील पण खाण्यापिण्याची पथ्ये पाळण्यात हयगय करू नये. उत्तरार्ध मात्र आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. अधिकारी व्यक्तींनी काम करवून घेताना सतर्क रहावे. अमावास्येदरम्यान विशेष लक्ष घालावे. शनि महाराजांची दृष्टी आपल्यावर आहे हे लक्षात घेऊन आपण बरे आणि आपले काम बरे अशी वृत्ती ठेवणे योग्य राहील. संधीचा गैरफायदा घेऊ नका. 

धनु - चुकांकडे दुर्लक्ष करा. -गृहसौख्य उत्तम राहील. भाग्यस्थानी होणारी पौर्णिमा धनदायक. पूर्वार्धात शेअर बाजारात लाभाची संधी. मात्र जवळच्या व्यक्तींशी वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्यानुसार वागणे हितावहच आहे. पण दोन पिढ्यांच्या मधला दुवा होण्याचे आणि काही सुवर्णमध्य गाठून सर्वांची मने सांभाळण्याचे काम करावे लागेल. उत्तरार्धात कामाच्या  ठिकाणी ताण पडेल. करमणुकीत वेळेचा अपव्यय टाळावा. जोडीदारावर खर्च होण्याची शक्यता. काही बारीकसारीक कुरबुरींकडे दुर्लक्ष करावे नाहीतर नात्यामध्ये तणाव राहील. कोणाचीही चुकांची कबुली मिळवण्याचा अट्टाहास टाळावा. 

मकर - संयमित, सुखद महिना. - साडेसातीतील संयमित आणि सुखद महिना. उत्तम संवादामुळे संततीसौख्य चांगले राहील. जोडीदारासाठी काही महत्वाच्या घडामोडींचा काळ. मनासारख्या घटना होतील त्यामुळे आनंदी रहाल. कामाच्या ठिकाणी मानसिकता चांगली राहील. कामाचे समाधान मिळेल. अमावस्येदरम्यान विनाकारण इतरांशी तुलना करू नका. प्रवासाचे आखलेले बेत फसण्याची शक्यता आहे. पूर्वार्धात शेअर व्यवहारात फायदा मिळवू शकाल. उत्तरार्धात आईच्या तब्येतीची चिंता वाटण्याचा संभव. शत्रुपक्षावर मात करू शकाल. राहूची स्थिती प्रत्येक बाबतीत यश- अपयशाचा लेखाजोखा न मांडण्याचे सुचवत आहे. त्यामुळे पुढे फक्त त्रागा पदरात पडेल. सकारात्मक रहाण्याचा प्रयत्न करा. 

कुंभ - तिखट प्रतिक्रिया टाळा. - पूर्वार्धात धनस्थानातील राजयोगकारक शुक्र आर्थिक स्तरावर मनासारखी स्थिती ठेवेल. केलेल्या कामांचा परतावा आणि नवीन कामांना मिळाल्यामुळे खुश रहाल. भाग्याची साथ राहील. पण हुरळून न जाता पुढील तरतुदी करून ठेवणे उत्तम. शेअर्स व्यवहारात मात्र फार अपेक्षा ठेऊ नयेत. पौर्णिमेदरम्यान जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. तिखट प्रतिक्रिया टाळा. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. उत्तरार्धात भावंडांबरोबर संवाद साधाल. एकूणच शेजारी- पाजारी, भावंडे यांच्याशी तुटकपणा येण्याची शक्यता आहे. 

मीन - वाहन जपून चालवा. - भावंडसौख्य उत्तम राहील. पौर्णिमेदरम्यान करमणुकीवर खर्च करण्याकडे कल राहील. प्रवासाचे योग आहेत मात्र उत्तरार्धात वाहनाची नीट काळजी घ्या. कामाला प्राधान्य देण्याचीही वृत्ती वाढेल; तरी आर्थिक प्राप्ती अपेक्षेप्रमाणे होणार नाही. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ सहकाऱ्यांप्रति आकस राहील. साडेसाती  परिणामस्वरूप गोष्टी विलंबाने होण्याकडे कल राहील. मनःस्वास्थ्य बिघडू न देणे तुमच्या हातात आहे. उत्तरार्धात प्रकृतीकडेही विशेष लक्ष द्यावे. रोजचा व्यायाम हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. 

~ सौ प्रज्ञा तिखे 

ज्योतिष शास्त्री.

9850502211 राशिभविष्य - मार्च 2023

9850502211

No comments: