Wednesday, January 23, 2019

भाग्यांक म्हणजे ....

भाग्यांक म्हणजे काय? 

भाग्यांक म्हणजे व्यक्तीच्याजन्मतारखेची एक अंकी बेरीज. या अंकात जन्म महिना व जन्मवर्ष यांचा विचार होत नाही. म्हणजेच व्यक्तीची जन्मतारीख जर १, १० किंवा १९,२८ यापैकी काहीही असली तरी त्यांचा भाग्यांक एक असेल तसेच ज्यांची जन्मतारीख ५,१४,२३ यापैकी असते त्यांचा भाग्यांक पाच असेल याप्रमाणे. जेव्हा पूर्ण जन्मतारखेची म्हणजेच जन्म तारीख, महीना व पूर्ण चार आकडी वर्ष यांची एक अंकी बेरीज जी येईल त्याला अंकशास्त्रात 'प्रारब्ध अंक' असे म्हणले जाते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमध्ये या दोन्ही अंकांचा खूप मोठा वाटा असतो. आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या  गोष्टी या अंकांच्या अंमलाखाली असल्याचे तुमच्या लक्षात येईल. उदा: तुमचा विवाह, नोकरीचा पहिला दिवस किंवा interview ची तारिख वगैरे. थोडा विचार करून बघा बरं ! असे १ ते ९ या अंकांचा विचार या शास्त्रात केला जातो. आपण पुढील पोस्टमध्ये प्रत्येक अंकाचा स्वतंत्र विचार करू.

मागील पोस्ट मध्ये मी भाग्यांक तक्त्याचा (bhagyank chart) उल्लेख केला आहे. प्रत्येक भाग्यांकाचा तक्ता वेगळा असतो. शास्त्राप्रमाणे सोने, चांदी अथवा तांब्याच्या पत्र्यावर असा तक्ता बनवून त्याचा ताईत करून तो जास्तीत जास्त वेळ आपल्या बरोबर राहिल्याने हे अंक निश्चितच आपल्यासाठी सकारात्मक परिणाम करणारे ठरू शकतात. अन्यथा साध्या कागदावर ठराविक पद्धतीने केलेला तक्ता देखील परिणाम कारक ठरू शकतो असे माझे मत आहे. प्रत्येकाने स्वानुभवाने निर्णय घेणे योग्य होईल.

अंकशास्त्रात प्रत्येक अंक हा एक ग्रह निर्देशित करतो. ते कोणते ते पाहू.
१ --- रवि, २ --- चंद्र, ३ --- गुरु, ४ --- हर्षल, ५ --- बुध, ६ --- शुक्र, ७ --- नेपच्यून, ८ --- शनि, ९ --- मंगळ
आपल्या भाग्यांकावर कोणत्या ग्रहाचा अंमल आहे हे तुम्ही आता ओळखू शकाल. प्रत्येक ग्रहांचे स्वरूप काय आहे हे वेध भविष्याचा येथे मी पोस्ट करेन तर या पुढच्या पोस्ट मधे प्रत्येक अंक काय दर्शवतो हे आपण पाहू.

तुम्हाला हा लेख कसा वाटला याबद्दल नक्की comment करा आणि या शास्त्राबद्दल आणखी जाणून घ्या www.pradnyaastro.blogspot.com वर !
तुमचे प्रश्न most welcome !!

6 comments:

Unknown said...

ताई खूप सुंदर आणी खरी माहिती मिळाली.
मला भाग्यांक तकता काय आहे आणी
त्याचा उपयोग या विषयी माहिती सांगाल का?

अर्चना
Member of Bjss Mahila aaghadi
Rani Laxmibai Bachat Gat

Unknown said...

ताई खूप सुंदर आणी खरी माहिती मिळाली.
मला भाग्यांक तकता काय आहे आणी
त्याचा उपयोग या विषयी माहिती सांगाल का?

अर्चना
Member of Bjss Mahila aaghadi
Rani Laxmibai Bachat Gat

Pradnya said...

अर्चना ताई, अजून माहिती घेण्यासाठी ७७७६०५८७८४ वर फोन करा.

Unknown said...

खुप सुंदर माहिती दीली आहे।

mazhiya..mannaaaaaaaa!!! said...

Khup upyukta info...

Pradnya said...

धन्यवाद! 🙏🏼